IND vs ENG | ‘बॅटिंग ऑर्डरचा नंबर बदलल्यामुळे मी….’, टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची प्रामाणिक कबुली

| Updated on: Feb 22, 2024 | 8:22 AM

IND vs ENG | टीममधल्या एखाद्या प्लेयरची फलंदाजीची क्रमवारी बदलली, तर त्याच्या खेळावर परिणाम होण स्वाभाविक आहे. कारण त्याला ठराविक एका नंबरवर फलंदाजीची सवय असते. तो नंबर बदलला, तर जुळवून घेण त्याला कठीण जातं. टीम इंडियातील एका प्लेयरने फलंदाजीचा नंबर बदलण्यावरुन त्याची काय मनस्थिती होती, त्या बद्दल सांगितलय.

IND vs ENG | बॅटिंग ऑर्डरचा नंबर बदलल्यामुळे मी...., टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची प्रामाणिक कबुली
ind vs eng
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs ENG | भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत युवा खेळाडू चांगल प्रदर्शन करतायत. पहिली कसोटी गमावल्यानंतर पुढच्या दोन कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कमबॅक केलं. सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. या सीरीजमध्ये सरफराज खानने भविष्याच्या दृष्टीने अपेक्षा निर्माण केल्या आहेत. रजत पाटीदारला संधी मिळूनही अजूनही प्रभाव पाडता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला शुभमन गिलची सतत चर्चा सुरु असते. शुभमन गिलचे कसोटीमधील आकडे त्याच्या क्षमतेला साजेसे नाहीयत. T20 आणि वनडेच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिल अजून तितका आश्वासक वाटलेला नाही. त्यामुळे शुभमन गिलला बसवून त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची मागणी सतत होत असते. कारण कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलच्या कामगिरीत सातत्य नाहीय. स्वत: शुभमन गिलला सुद्धा याची कल्पना आहे.

सध्या सुरु असलेल्या टेस्ट सीरीजमध्ये सर्वांच्या नजरा शुभमन गिलवर आहेत. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत शुभमन गिलसमोर काही आव्हान आहेत. फॉर्ममध्ये पुनरागमन करण हे गिलसमोरच मुख्य आव्हान आहे. कारण कसोटी क्रिकेटमधील आकडे हे गिलसाठी फार चांगले नाहीयत. T20 आणि वनडेच्या तुलनेत टेस्टमध्ये शुभमन गिलला अजून म्हणावी तशी दमदार कामगिरी करता आलेली नाहीय. मनासारखी कामगिरी होत नसल्याने गिल स्वत:च निराश होता.

एक नवीन अनुभव

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला उतरण हा गिलसाठी एक नवीन अनुभव होता. त्याने या क्रमांकावर फलंदाजी करताना आतापर्यंत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये पहिल्या तीन सामन्यात 252 धावा केल्या आहेत. यात विशाखापट्टणममध्ये 104 धावा शतकी खेळी आणि राजकोटमधील 91 धावा आहेत.

म्हणून मी निराश होतो

“स्वत:च्या अपेक्षेनुसार प्रदर्शन न होण हे पचवण कठीण असतं. बाहेर बसणारे लोक या बद्दल बोलतात, तेव्हा मला फार काही वाटत नाही. पण मला स्वत:कडून ज्या अपेक्षा आहेत, तस प्रदर्शन होत नसल्याने मी निराश होतो” असं रांची टेस्टआधी शुभमन गिल म्हणाला.

ओपनिंग ऐवजी तिसरा नंबर

“तुम्हाला स्वत:कडून काही अपेक्षा असतात. पण म्हणून माझी मानसिकता बदलली नाही. तुम्ही पुढच्या आव्हानासाठी तयार असलं पाहिजे. एक मोठा प्लेयर आणि सरासरी खेळाडू यांच्यामध्ये हेच अंतर असतं” असं शुभमन गिल म्हणाला. शुभमन गिलने 11 इनिंगमध्ये एकही अर्धशतक झळकवल नव्हतं. यात इंग्लंड विरुद्ध मागच्या महिन्यातील हैदराबाद कसोटी सुद्धा आहे. पहिल्या कसोटीपासून शुभमन ओपनिंग ऐवजी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला येतोय. तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करणं माझ्यासाठी एक वेगळ आव्हान होतं हे शुभमन गिलने मान्य केलं.