चटोग्राम: अखेर शुभमन गिलची प्रतिक्षा संपली आहे. चटोग्राम कसोटीच्या दुसऱ्याडावात भारताच्या या सलामीवीराने शानदार शतक ठोकलं. शुभमन गिलने आपल्या कसोटी करीअरमधील पहिलं शतक लगावलं. याआधी शुभमन गिलची ब्रिसबेनमध्ये कसोटी शतकाची संधी हुकली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये तो 91 रन्सवर आऊट झाला होता. आज चटोग्राम टेस्टमध्ये तो नर्वस नाइंटीजला बळी पडला नाही. त्याने शतक झळकवून विश्वास सार्थ ठरवला. शुभमन गिलची प्रतिक्षा तब्बल 700 दिवसानंतर संपली आहे.
हे शतक खास आहे, कारण…
बांग्लादेश विरुद्ध शुभमन गिलने 147 चेंडूत शतक पूर्ण केलं. गिलच्या शतकी खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार आहेत. शुभमन गिलने बिनधास्त खेळी करत शतक ठोकलं. 95 धावांवर असताना त्याने रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला. 99 धावांवर असताना त्याने पुढे येऊन लॉन्ग ऑनवरुन चौकार ठोकला.
आधी सिक्स मारला, मग…
शुभमन गिलने 151 चेंडूत 110 धावा केल्या. शतकानंतर त्याने वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न केला. मेहदी हसनच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. त्यानंतर मोठा फटका खेळताना तो बाद झाला.
शुभमनला नशिबाची साथ
शुभमन गिलला नशिबाची साथ लाभली. दुसऱ्या इनिंगमध्ये 32 व्या षटकात गिल विरुद्ध LBW च अपील झालं. अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं. बांग्लादेशने डीआरएस मागितला. पण त्याचं नशीब चांगलं होतं. डीआरएसची टेक्नोलॉजी खराब झाली होती. त्यामुळे गिल नशिबवान ठरला.
Live – https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/pRO6sqCxx9
— BCCI (@BCCI) December 16, 2022
गिलच कमालीच शॉट सिलेक्शन
दुसऱ्या इनिंगमध्ये गिलने शॉर्ट चेंडूंविरोधात आक्रमक बॅटिंग केली. मैदानाच्या चौतरफा त्याने फटकेबाजी केली. इनिंगमध्ये गिलने 40 सिंगल आणि 6 डबल्स धावा पळून काढल्या. त्याने स्ट्राइक रोटेशनवर काम केलं. शुभमन गिलसाठी 2022 खास वर्ष राहिलं. त्याने 16 इनिंग्समध्ये 60.69 च्या सरासरीने 789 धावा केल्या. याआधी त्याने झिम्बाब्वे विरुद्ध वनडेमध्ये शतक झळकावलं होतं. त्याने 4 हाफ सेंच्युरी झळकवल्यात.