IND vs BAN 1ST Test: नशीब असावं, तर शुभमन गिल सारखं, बांग्लादेशच्या टीमने DRS घेतला पण….

| Updated on: Dec 16, 2022 | 2:43 PM

IND vs BAN 1ST Test: अंपायर DRS चा वापरच करु शकले नाही, कारण....

IND vs BAN 1ST Test: नशीब असावं, तर शुभमन गिल सारखं, बांग्लादेशच्या टीमने DRS घेतला पण....
Shubhaman Gill
Image Credit source: PTI
Follow us on

ढाका: चटोग्राम टेस्टच्या दुसऱ्यादिवशी मैदानात एक वेगळच दृश्य पहायला मिळालं, ज्याची अपेक्षा कोणीच केली नव्हती. आज कसोटीचा तिसरा दिवस आहे. शुभमन गिल विरोधात LBW चं अपील करण्यात आलं. पण अंपायरनी गिलला नॉट आऊट ठरवलं. त्यानंतर बांग्लादेशने रिव्यु घेतला. गिल आऊट आहे, असं बांग्लादेशी खेळाडूंच मत होतं. म्हणूनच कॅप्टन शाकीब अल हसनने DRS घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे घडलं, ते खरोखरच हैराण करुन सोडणार आहे. अंपायर्सना शुभमन विरोधात DRS चा वापर करता आला नाही. कारण टेक्नोलॉजी फेल गेली.

काय घडलं? तिसऱ्या अंपायरने काय सांगितलं?

शुभमन गिल विरोधात अपील झालं. तिसऱ्या पंचांकडे डीआरएस मागितलं. त्यावेळी त्यांनी मैदानातील अंपायर्सना, या टेक्नोलॉजीचा वापर करता येणार नाही, असं सांगितलं. बॉल ट्रॅकिंग कॅमेरा खराब झाल्याच तिसऱ्या अंपायरने सांगितलं. त्यामुळे मैदानी अंपायरचा निर्णय मान्य करावा लागला. मैदानी अंपायरने शुभमन गिलला नॉटआऊट ठरवलं होतं. तोच निर्णय त्यांनी कायम ठेवला. शुभमन गिलला नशिबाची साथ लाभली. मैदानातील अंपायर्सनी त्याला नॉट आऊट ठरवलं होतं.


शुभमन गिलची चांगली फलंदाजी

शुभमन गिल पहिल्या डावात खराब फटका खेळून बाद झाला होता. पण दुसऱ्या इनिंगमध्ये तो अलर्ट दिसला. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 84 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. गिलचं हे 5 व कसोटी अर्धशतक आहे. राहुलसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी केली. पुजारासोबत गिलने चांगली पार्टनरशिप केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव 150 धावात आटोपला.