‘शुबमन गिल असेल टीम इंडियाचा कर्णधार’, सूर्यकुमार-रोहितची जागा घेणार!

| Updated on: Aug 06, 2024 | 3:57 PM

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादव आणि वनडे संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. असं असताना शुबमन गिलचं नाव अचानक कर्णधारपदासाठी चर्चेत कसं काय आलं? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर पुढे तुम्हाला सविस्तर जाणून घेता येईल.

शुबमन गिल असेल टीम इंडियाचा कर्णधार, सूर्यकुमार-रोहितची जागा घेणार!
Image Credit source: PTI
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात बरीच उलथापालथ झाली आहे.झिम्बाब्वे दौऱ्यात शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळली. त्यानंतर प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागली आणि कर्णधारांची निश्चिती झाली. यात टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे, तर वनडे-कसोटी संघाची धुरा रोहित शर्माकडे आली. तर टी20 आणि वनडे संघाचा उपकर्णधार म्हणून शुबमन गिलची निवड करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की, रोहित शर्माने वनडे आणि कसोटीतून निवृत्ती घेतली तर कर्णधारपद कोणाकडे सोपवलं जाईल. या प्रश्नाचं उत्तर टीम इंडियाचा माजी क्षेत्ररक्षण कोच आर श्रीधर याने दिलं आहे.श्रीधर यांनी केलेल्या दाव्यानुसार, टीम इंडियाचा पुढचा कर्णधार शुबमन गिल होईल. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिलकडे वनडे आणि कसोटी संघाची धुरा सोपवली जाईल. या मागचं कारणही त्यांनी सांगितलं.

आर श्रीधर यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं की, शुबमन गिल सर्व फॉर्मेटचा खेळाडू आणि रोहित शर्माचा उत्तराधिकारी असेल. रोहित शर्माच्या जागी तोच कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार होईल. 2027 वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार होईल. श्रीधर यांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्य देखील जाणवत आहे. कारण टीम इंडियाने शुबमन गिलला उत्तराधिकारी घोषित केलेलं दिसत आहे. कारण गिलला श्रीलंका दौऱ्यापूर्वी वनडे आणि टी20 संघात उपकर्णधारपद सोपवलं. इतकंच काय तर बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते.

दुसरीकडे, शुबमन गिलला कर्णधारपद सोपवणं वाटतं तितकं सोपं देखील नाही. यासाठी त्याला चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. मागच्या सामन्यात शुबमन गिलची बॅट काही चालली नाही. खासकरून कसोटी आणि टी20 फॉर्मेटमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्यामुळेच टी20 संघाचं उपकर्णधारपद सोपवल्याने क्रीडा जाणकारांनी टीका देखील केली होती. त्याचा टी20 मधील स्ट्राईक रेट कायम चर्चेचा विषय ठरला आहे. गौतम गंभीरने एका मुलाखतीत टी20 मध्ये गिलची तुलना थेट पृथ्वी शॉसोबत केली होती. गिलपेक्षा पृथ्वी कधीही चांगला असं सांगितलं होतं. त्यामुळे गिलला कर्णधार व्हायचं असेल चांगलं प्रदर्शन करावं लागेल.