Mumbai Indians IPL 2023 : धोनीने जे वॅटसन बरोबर केलं, मुंबईलाही रोहितच्या बाबतीत तसच वागण्याचा सल्ला

| Updated on: May 11, 2023 | 10:25 AM

Mumbai Indians IPL 2023 : प्रसिद्ध कॉमेंटेटरने मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला रोहितच्या बाबतीतही तसच वागण्याबद्दल सुचवलय. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मते रोहित शर्मा टीमसाठी ओझ बनलाय.

Mumbai Indians IPL 2023 : धोनीने जे वॅटसन बरोबर केलं, मुंबईलाही रोहितच्या बाबतीत तसच वागण्याचा सल्ला
Rohit sharma IPL 2023
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या टीमला IPL 2023 मध्ये सूर गवसलाय. मुंबईच्या टीमने आतापर्यंत तीनवेळा 200 पेक्षा जास्त धावांच लक्ष्य आरामात पार केलय. मुंबईची टीम फॉर्ममध्ये येणं, ही इतर टीमसाठी धोक्याची घंटा आहे. मुंबईची टीम दमदार कामगिरी करतेय, पण त्यांच्यासाठी एक चिंतेची बाब आहे, तो म्हणजे रोहित शर्माचा फॉर्म. प्रत्येक सामन्यागणिक रोहितची कामगिरी ढासळतेय,

ही मुंबई इंडियन्ससाठी चिंताजनक बाब आहे. मागच्या सीजनमध्ये सुद्धा रोहित आऊट ऑफ फॉर्म होता. या सीजनमध्ये सुद्धा चित्र बदललेलं नाही. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मते रोहित शर्मा टीमसाठी ओझ बनलाय.

रोहितची फक्त एक हाफ सेंच्युरी

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा फक्त 7 रन्सवर आऊट झाला. मुंबईने RCB विरुद्धची ही मॅच 6 विकेटने आरामात जिंकली. रोहितला या सीजनमध्ये फक्त एक हाफ सेंच्युरी झळकवता आलीय.

खराब फॉर्ममध्य असला, तरी रोहितला खेळवा, कारण….

मुंबई इंडियन्ससाठी धावा बनवताना रोहित शर्माला संघर्ष करावा लागतोय. दरम्यान न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सायमन डुल यांनी रोहितच्या चालू सीजनमधील खराब फॉर्मबद्दल एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलय. मुंबई इंडियन्सने आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रोहित शर्माला प्लेइंग 11 मध्ये का खेळवाव? त्यामागच कारण सांगितलय.

रोहितच्या बाबतीत हेच करण्याचा सल्ला

क्रिकबझवर बोलताना सायमन डुल यांनी ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर शेन वॉटसनच उदहारण दिलं. “जेव्हा टीम एखादा खेळाडू धावा करत नसताना, जिंकत असेल, तर त्या खेळाडूवर विश्वास ठेवला पाहिजे. सीएसकेने 2018 साली शेन वॅटसनच्या बाबतीत हेच केलं होतं. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांनी वॅटसनला खेळवलं. त्याच वॅटसनने फायनलमध्ये विश्वासाची परतफेड केली” याची आठवण डुल यांनी करुन दिली. त्यांनी एकप्रकारे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला रोहितच्या बाबतीतही अप्रत्यक्षपणे हाच मार्ग सुचवलाय.