T20 WC: डॅरेल मिचेलची फलंदाजी पाहून किवी दिग्गजाला एमएस धोनी आठवला, कॉमेंट्रीदरम्यान मनातलं बोलला

| Updated on: Nov 11, 2021 | 5:05 PM

सुरुवातीच्या अपयशानंतरही, न्यूझीलंडने सलामीवीर डॅरेल मिशेलचे झंझावाती अर्धशतक आणि जेम्स नीशमच्या शेवटच्या क्षणी केलेल्या आक्रमणाच्या जोरावर इंग्लंडवर एक षटक आणि पाच गडी राखून विजय मिळवला.

T20 WC: डॅरेल मिचेलची फलंदाजी पाहून किवी दिग्गजाला एमएस धोनी आठवला, कॉमेंट्रीदरम्यान मनातलं बोलला
Daryl Mitchell
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) स्पर्धेत बुधवारी आपल्याला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. बुधवारी या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. या साम्यानत इंग्लंडचा संघ एका क्षणी सामना जिंकेल असेच वाटत होते. पण शेवटच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत विजय आपल्या नावे केला. यावेळी नाबाद 72 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल हिरो ठरला आहे. डॅरेल मिचेलच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली आहे. तसेच वर्ल्डकप फायनलचं तिकीट मिळवलं. (Simon Doull gives epic MS Dhoni reference as Daryl Mitchell leads New Zealand to thrilling Victoey vs England in T20 WC semifinal)

सुरुवातीच्या अपयशानंतरही, न्यूझीलंडने सलामीवीर डॅरेल मिशेलचे झंझावाती अर्धशतक आणि जेम्स नीशमच्या शेवटच्या क्षणी केलेल्या आक्रमणाच्या जोरावर इंग्लंडवर एक षटक आणि पाच गडी राखून विजय मिळवला. डॅरिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून माजी किवी वेगवान गोलंदाज सायमन डूल (Simon Doull) यांना भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आठवला. समालोचन करताना डूल यांनी डॅरिल मिचेलच्या फलंदाजीचे कौतुक केले.

सामना संपणार असताना समालोचन करत असलेल्या सायमन डूल यांनी सांगितले की, डॅरिलची फलंदाजी महेंद्रसिंग धोनीने सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून देते. तो म्हणाला, ‘बेस्ट फिनिशर आणि महान खेळाडू एमएस धोनीने मला एकदा सांगितले होते की, तुम्ही जितका जास्त वेळ फलंदाजी कराल, तितके तुम्ही प्रतिस्पर्धी आणि गोलंदाजांना त्रास द्याल. आज डॅरेलने तेच केले. त्याने पाहिले की दोन विकेट खूप झटपट गेल्या, मग त्याने ठरवले की आपण जबाबदारी स्वीकारू आणि शेवटपर्यंत टिकून राहू, आणि आता त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे.

इंग्लंडवर मात करत न्यूझीलंड फायनलमध्ये

या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत 166 धावांची आश्वासक धावसंख्या गाठली. यावेळी जोस बटलरने 29 धावा करत चांगली सुरुवात केली. ज्यानंतर डेविड मलानने 42 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्याला मोईन अलीने नाबाद 52 धावांची फिनींशिंग देत संघाची धावसंख्या 166 पर्यंत पोहचवली.

इंग्लंडने 167 धावांचे आव्हान दिल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर गप्टील आणि कर्णधार विल्यमसन स्वस्तात बाद झाल्यानंतर संघ फार मागे पडला. त्याचवेळी डेवॉन कॉन्वे आणि डेविड मलान यांनी एक उत्तम भागिदारी रचत संघाचा डाव सावरला. 46 धावा करुन कॉन्वे बाद होताच. जेम्स निशामने 27 धावांची फटकेबाजी करत विजय जवळ आणला. जो विजय डॅरेल मिचेलने नाबाद 72 धावांच्या खेळीसह चौकार मारुन न्यूझीलंडच्या नावे केला. न्यूझीलंडने 1 षटक आणि 5 गडी राखून विजय मिळवला आहे.

इतर बातम्या

T20 WC, Aus Vs Pak : सेमी फायनलच्या आधी पाकिस्तानवर संकट, चलतीचे दोन बॅटसमन फ्लूनं डाऊन, प्रॅक्टीसही टाळली

VIDEO: पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी भलत्याच गुर्मीत, LIVE मॅचदरम्यान भारतीय फलंदाजांची नकल करत उडवली खिल्ली

ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा पहिल्या स्थानावर कायम, ‘टॉप 10’ मध्ये एकही भारतीय नाही

(Simon Doull gives epic MS Dhoni reference as Daryl Mitchell leads New Zealand to thrilling Victoey vs England in T20 WC semifinal)