Sinikiwe mpofu dies: क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आलीय. झिम्बाब्वेची माजी क्रिकेटपटू आणि महिला कोच सिनीकिवे मोफू यांचा मृत्यू झालाय. मोफू फक्त 37 वर्षांच्या होत्या. मोफूचा मृत्यू कशामुळे झाला? त्यामागे काय कारण आहे? ते अजून कळलेलं नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार मोफू तिच्या घरी असताना, अचानक कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मोफूला मृत घोषित केलं. सिनीकिवे मोफूच नाव झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातं. झिम्बाब्वेच्या महिला टीमने 2006 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मोफू त्या टीमचा भाग होती.
दोन मुलं झाली अनाथ
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात सिनीकिवे मोफूवर दु:खाचा डोंगर कोसळला. तिचे पती शेफर्ड मकुनूरा यांचा 15 डिसेंबरमध्ये मृत्यू झाला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. मुकुनूरा झिम्बाब्वेचे फिल्डिंग कोच होते. आता सिनीकिवे मोफूच्या अकाली निधनामुळे तिची दोन मुल अनाथ झाली आहेत.
Under her tutelage as Head Coach, Mountaineers Women won the inaugural Fifty50 Challenge – Zimbabwe’s provincial one-day championship for women – in the 2020/21 season.
Last season, she led them to another final, finishing as runners-up in the Women’s T20 Cup.#RIPSneeze pic.twitter.com/6i8xHuI1cC
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 7, 2023
मोफू पहिली महिला कोच
21 फेब्रुवारी 1985 साली बुलावायोमध्ये सिनीकिवे मोफूचा जन्म झाला. क्रिकेटर त्यानंतर कोच बनणारी ती झिम्बाब्वेची पहिली महिला खेळाडू आहे. वर्ष 2020-21 च्या सीजनमध्ये सिनीकिवे मोफूच्या कोचिंगमध्ये माउंटेनीयर्स टीमने वनडे चॅम्पियनशिप जिंकली.
मागच्यावर्षी तिच्या मार्गदर्शनाखाली टीम फायनलमध्ये पोहोचली होती. आपल्या माजी महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूवर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दु:ख व्यक्त केलय.