मुंबई: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या आपल्या क्रिकेट (Cricket) करीयरमधल्या एका कठीण काळातून जातोय. त्याला धावा करणं शक्य होत नाहीय. धावा बनवण्यासाठी तो त्याच्या बाजूने कुठली कसर बाकी ठेवत नाहीय. पण खराब फॉर्ममुळे त्याच्या धावाच होत नाहीयत. तो लवकर बाद होतोय. काल सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात असंच घडलं. मॅचच्या पहिल्याच बॉलवर विराट आऊट झाला. सहाजिकच डगआऊट एररियामध्ये परतताना निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टरपणे दिसत होती. क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात मागच्या दोन वर्षात शतक झळकावणं त्याला जमलेलं नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातही त्याचा संघर्ष सुरुच आहे. या सीजनमध्ये तीनेवेळा तो गोल्डन डक म्हणजे शुन्यावर बाद झालाय.
काल सनराजयर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जगदीश सुचिताने त्याला पहिल्या बॉलवर आऊट केलं. विराटची सध्याची स्थिती पाहून अनेक माजी क्रिकेपटूंना त्याला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराटला बिलकुल या उलट सल्ला दिला आहे. सुनील गावस्करांनी विराटला फॉर्म परत येईपर्यंत, खेळत रहाण्याचा सल्ला दिला आहे. गावस्करांच्या मते खेळाडूला चेंजिंग रुममध्ये बसून फॉर्म परत मिळणार नाही.
“तुम्ही खेळला नाहीत, तर तुम्हाला तुमचा फॉर्म परत कसा मिळणार?. चेंजिंग रुममध्ये बसून फॉर्म परत येणार नाही. जितके जास्त तुम्ही खेळाल, तितका तुम्हाला तुमचा फॉर्म परत मिळण्याची शक्यता आहे” असे सुनील गावस्कर स्टार स्पोर्टसवरील कार्यक्रमात रविवारी म्हणाले.
गरज असेल, तेव्हाच कोहलीने ब्रेक घ्यावा, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं. कोहलीचे भारताचे सामने मिस होणार नाहीत, तेव्हाच त्याने ब्रेक घ्यावा, असं सुनील गावस्कर म्हणाले. भारताच्या सामन्यांची तयारी करण्यासाठी कोहलीने आयपीएलमधून ब्रेक घ्यावा, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं. “ब्रेक असा नसावा, की ज्यात विराट कोहली भारताचे सामने खेळू शकणार नाही. भारताचे सामने पहिली प्राथमिकता असली पाहिजे” असं गावस्कर म्हणाले.