नवी दिल्ली: भारतासह जगभरात क्रिकेट (Cricket) खेळणारे व त्याचा पाहून आनंद घेणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा रोमांचक (Thriller) खेळ पाहताना काळजाचा ठोका चुकेल असे क्षण अनुभवणे म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक अनोखी मेजवानी असते. सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच टिकून राहिल्यास खेळाची मजा काही वेगळीच असते. आम्ही तुम्लाला सांगत असलेला हा काही आंतरराष्ट्रीय (international) सामना नव्हता. तसेच हा सामना कोणत्याही मोठ्या क्रिकेट लीगचा भागही नव्हता. तरीही या टी-२० (T-20) सामन्यात थरार होता. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये सर्व काही होत. त्यामुळेच हे षटक खास झाल. फलंदाजांचे येणे- जाणे, गोलंदाजांची हॅटट्रिक, नवा फलंदाज स्ट्राइकवर असणे, शेवटच्या चेंडूवर षटकार. विजयाचा एवढा आनंद की एक क्रिकेट चाहते म्हणून तुम्हाला ते थरारक क्षण पुन्हा पुन्हा पाहायला आवडतील. एका सामान्य स्पर्धेत खेळला जाणारा हा सामना होता, जो शेवटच्या षटकात पूर्ण झाला. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या मधल्या फळीने एकामागून एक शरणागती पत्करली अन् शेवट्या फळीवर सर्व मदार आली.
This is the definition of ABSOLUTE SCENES.
Six to win from the last ball, bowler has just taken a hat-trick and it’s your first ball on strike…
How good ?? pic.twitter.com/tYl89zksqI
— Cricket District ? (@cricketdistrict) January 24, 2022
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ‘एमओएस’ संघाने सामन्यात 154 धावा केल्या आणि ‘यूएनएसडब्ल्यू’समोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करताना 19व्या षटकापर्यंत 148 धावा झाल्या होत्या. विजय आता निश्चित झाला असताना मध्येच एक ट्विस्ट आला. अन् हातातोंडाशी आलेला सामना गमावण्याची वेळ ‘यूएनएसडब्ल्यू’समोर आली होती. परंतु मग झाला चमत्कार…
धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात काय झाले नाही ते विचारा. पहिला चेंडू ‘डेड’ गेला. दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज टर्नरने विकेट घेतली. त्यानंतर तिसर्या चेंडूवरही विकेट पडली. चौथ्या चेंडूवरही विकेट पाहिली. जिथे विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत फक्त 7 धावा हव्या होत्या, तिथे गोलंदाजाने हॅट्ट्रिक घेतली. 5 व्या चेंडूवर एकच धाव आली. म्हणजेच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आता क्रीझवर पूर्णपणे नवीन असलेल्या फलंदाजाकडे होता. आणि, तो हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासमोर उभा होता.
आता शेवटचा चेंडू आणि त्यावर विजयासाठी षटकाराची गरज होती. आता काय होणार म्हणून सामना पाहत असलेल्या प्रेक्षकांचाही श्वास रोखला गेला. गोलंदाजाच्या चेंडूवर फलंदाजाने बॅट फिरवली. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. आणि फलंदाजी करणाऱ्या ‘यूएनएसडब्ल्यू’ या संघाचा विजय निश्चित झाला. हा विजय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. डोळ्यांचे पारणे फेडणार्या या सामन्यातील फलंदाजांचा उत्साह अधिक होता. सर्व खेळाडू मैदानावरच जमले, अन् एकच जल्लोष केला.
ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं