नवी दिल्ली : क्रिकेटपटू नीतीश राणा सध्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये व्यस्त आहे. नीतीश राणा केकेआरचा कर्णधार आहे. त्यामुळे टीमचं नियोजन, संघाला प्लेऑफमध्ये नेण्यासाठीची रणनीती करण्यात सध्या तो व्यस्त आहे. परंतु, आयपीएलमध्ये व्यस्त असणाऱ्या नीतीशसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. बातमी नीतीशची पत्नी साची मारवाह हिच्याशी संबंधित आहे. साची सध्या दहशतीखाली आहे. कारण दोन अज्ञात व्यक्ती तिचा सातत्याने पाठलाग करत आहेत. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आहे. तिचं घराच्या बाहेरही पडणं अशक्य झालं आहे.
एखादा अनोळखी व्यक्ती तुमचा जर सातत्याने पाठलाग करत असले तर तुम्हीही दहशतीखाली याल. तुम्हालाही जीवाची भीती वाटेल. तुमचंही घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल. साची मारवाह हिच्याबाबतही असच काहीसं झालं आहे. साचीने इन्स्टाग्रामवर तिची स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. या खरतनाक घटनेची माहिती देतानाच दिल्ली पोलिसांकडून तिला कोणता धक्कादायक सल्ला दिला याची माहितीही तिने दिली आहे. त्यामुळे सर्वच चक्रावून गेले असून दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
केकेआर संघाचा कर्णधार नीतीश राणा याची पत्नी साची मारवाह ही तिच्या घराच्या समोरच्या रस्त्यावरून जात असताना ही घटना घडली. तिच्या इन्स्टा स्टोरीनुसार ही घटना दिल्लीच्या कीर्ती नगरची आहे. या ठिकाणी दोन अनोळकी तरुणांनी तिचा पाठलाग केला. एवढेच नव्हे तर तिचा पाठलाग करतानाच तिच्या कारला जोरदार धडकही मारली. पाठलाग करण्यापर्यंत ठिक होतं. योगायोगाने हे तरुण आपल्या मार्गावर येत असल्याचं तिला आधी वाटलं. पण या तरुणांनी तिच्या कारला धक्का दिल्यानंतर ती भयभीत झाली आहे. हे प्रकरण काही तरी वेगळच दिसतंय असं तिच्या लक्षात आलं.
Just saw Nitish Rana’s wife’s Instagram stories (Saachi Marwah). Two men hit her car and followed her and Delhi police to her to leave it since they left??? This is so unacceptable! pic.twitter.com/UMQwB92xWo
— PS ⚡️ (@Neelaasapphire) May 5, 2023
मोठा अनर्थ घडू नये म्हणून सांचीने थेट दिल्ली पोलीस ठाणे गाठले. साचीने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. स्वत:ची ओळख दिली आणि याप्रकरणात लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. त्यावर दिल्ली पोलिसांनी तिला दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. पोलीस म्हणाले, आता तू सुरक्षित घरी पोहोचली आहेस. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. पोलीस एवढंच सांगून थांबले नाहीत, तर या पुढे अशी घटना घडली तर गाडीचा नंबर नोट करून ठेव, असा सल्लाही पोलिसांनी तिला दिला. पोलिसांच्या या सल्ल्यामुळे साचीला प्रचंड धक्का बसला आहे.