कोलंबो : एमएस धोनीची टीम 5 व्यां दा आयपीएल चॅम्पियन बनली. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये गुजरात टायटन्सवर 5 विकेटने विजय मिळवला. फायनलमध्ये रवींद्र जाडेजा हिरो ठरला. त्याने लास्ट 2 चेंडूंवर एक सिक्स आणि एक फोर मारला. मथीसा पतिराणा सुद्धा चेन्नईचा हिरो ठरला. त्याने चेन्नईला फायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या गोलंदाजीने धोनीला प्रभावित केलं. एका मॅचमध्ये धोनी त्याच्यासाठी अंपायरला भिडला होता.
पतिराणा काही मनिटांसाठी मैदानाच्या बाहेर गेला. तो पुन्हा मैदानात आला, तेव्हा अंपायर्सनी त्याला लगेच गोलंदाजी करण्यापासून रोखलं. त्यावर धोनीने 5 मिनिट अंपायर्सना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं. वेळ निघून गेल्यानंतर त्याने त्याची ओव्हर पूर्ण केली.
घरच्या मैदानात धुलाई
आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे मथीसा पतिराणाला श्रीलंकेच्या टीममध्ये संधी मिळाली. त्याने श्रीलंकेकडून वनडे क्रिकेटमध्य़े डेब्यु केला. पण घरच्या मैदानात त्याची चांगलीच धुलाई झाली. श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये 3 सामन्यांची वनडे सीरीज खेळली जात आहे. श्रीलंकेत ही वनडे सीरीज सुरु आहे. श्रीलंकेला आपल्या घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा उचलता आला नाही.
किती धावा दिल्या?
पहिल्या वनडेमध्ये अफगाणिस्तानने श्रीलंकेला 6 विकेटने पराभूत केलं. आपल्या डेब्यु मॅचमध्ये पतिराणाने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, ते पाहून तो बॉलिंग विसरलाय असं वाटलं. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी त्याच्या बॉलिंगवर हल्ला चढवला. त्याच्या गोलंदाजीवर भरपूर धावा निघाल्या. पतिराणाने 8.5 ओव्हर्समध्ये 66 धावा दिल्या.
त्याने किती वाईड बॉल टाकले
पतिराणाला रहमत शाहाचा विकेट मिळाला. त्याने 55 धावा केल्या. पतिराणाने मोठी विकेट काढली. पण, तो पर्यंत उशीर झाला होता. पतिराणाने 8.5 ओव्हर्समध्ये 16 वाईड चेंडू टाकले. पतिराणाने आयपीएलच्या 12 सामन्यात 19 विकेट घेतले होते. पण श्रीलंकेकडून पहिल्या सामन्यात खेळताना त्याने भरपूर धावा दिल्या.
पतिराणाच्या खराब गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने 269 धावांच टार्गेट 4 विकेट गमावून 19 चेंडूआधीच गाठलं. श्रीलंकेने पहिली बॅटिंग करताना 50 ओव्हर्समध्ये 268 धावा केल्या होत्या.