SL vs AUS: पथुम निसंकाचं जबरदस्त शतक, श्रीलंकेने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाला वाईट पद्धतीने धुतलं

| Updated on: Jun 20, 2022 | 10:15 AM

कोलंबो मध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर (Sri vs Aus) जबरदस्त विजय मिळवला. पथुम निसंकाच्या जबरदस्त शतकाच्या बळावर श्रीलंकेने 6 विकेटने तिसरा वनडे सामना जिंकला.

SL vs AUS: पथुम निसंकाचं जबरदस्त शतक, श्रीलंकेने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाला वाईट पद्धतीने धुतलं
Pathun Nisanka
Image Credit source: AP/PTI
Follow us on

मुंबई: कोलंबो मध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर (Sri vs Aus) जबरदस्त विजय मिळवला. पथुम निसंकाच्या जबरदस्त शतकाच्या बळावर श्रीलंकेने 6 विकेटने तिसरा वनडे सामना जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत (one day Series) श्रीलंका आता 2-1 ने आघाडीवर आहे. सीरीजमधला पहिला सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने पुढचे दोन सामने जिंकले. हे असं 19 वर्षानंतर घडलय, जेव्हा श्रीलंकेने सलग दोन वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवलय. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 292 धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेने 9 चेंडू बाकी ठेवून व चार विकेट गमावून विजय मिळवला. 147 चेंडूत 137 धावांची खेळी करणारा पथुम निसंका (Pathum nissanka) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. निसंकाचं वनडे करीयरमधल हे पहिलं शतक आहे. कुशल मेंडिस 87 धावांची तडफदार खेळी खेळला. श्रीलंकेने प्रेमदासा स्टेडियमवर वनडे मधील सर्वोच्च धावसंख्या पार करण्याचा रेकॉर्ड केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा श्रीलंकन खेळाडू

निसंका वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा श्रीलंकन खेळाडू बनला आहे. याआधी सनथ जयसूर्याच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 2003 साली सिडनीमध्ये 122 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2006 मध्ये 114 धावा बनवल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली होती

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये सहा विकेट गमावून 291 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब होती. ट्रेविस हेडने नाबाद (70), कॅप्टन एरोन फिंचने (62) आणि एलॅक्स कॅरीने (49) धावा करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एकवेळ ऑस्ट्रेलियाने 193 धावात 5 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ट्रेविड हेड आणि ग्लेन मॅक्सवेलने दमदार फलंदाजी केली. ट्रेविड हेड 70 धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलने 18 चेंडूत 33 धावा फटकावून ऑस्ट्रेलियाला 291 पर्यंत पोहोचवले. जेफ्री वेंडरसेने 3 विकेट काढल्या.

निसंका-मेंडीसने रचला पाया

292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या श्रीलंकन संघाला 42 धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर निसंका आणि मेंडीसमध्ये 170 धावांची भागीदारी झाली. दोघांनी मिळून धावसंख्या 212 पर्यंत पोहोचवली. त्यानंतर मेंडीस 87 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मेंडीस परतल्यानंतर धनंजय डी सिल्वाने निसंकाला साथ दिली. श्रीलंकेला विजयाच्या समीप आणून ठेवल्यानंतर निसंका संघाची 284 धावसंख्या असताना आऊट झाला. त्यानंतर चरित असलंकाने विजयावर शिक्कामोर्तब केलं. निसंकाने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार खेचले.