गिलाँग: सलामीच्या सामन्यात श्रीलंकेचा नामिबीयाच्या टीमकडून पराभव झाला होता. या धक्कादायक पराभवातून उसळी घेत श्रीलंकेच्या टीमने वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर 12 राऊंडमध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेने गुरुवारी नेदरलँडला (SL vs NED) हरवलं. श्रीलंकेच्या विजयात कुसल मेंडिस (Kusal Mendis) आणि लेग स्पिनर वानेंदु हसारंगा हिरो बनले.
कुसल मेंडिसने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 79 धावा केल्या. गोलंदाजीत वानेंदु हसारंगाने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 3 विकेट काढल्या.
नेदरलँड्सकडून मॅक्स ओडॉडने अर्धशतक झळकावलं. पण तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. श्रीलंकेने या विजयासह सुपर 12 राऊंडमध्ये प्रवेश केला. श्रीलंकेने सामना 16 धावांनी जिंकला.
कुशल मेंडिस बनला विजयाचा हिरो
श्रीलंकेचा विकेटकीपर फलंदाज कुसल मेंडीस टीमच्या विजयात हिरो ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने 5 सिक्स आणि 5 चौकार लगावले. त्याने 79 धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट 179 चा होता. त्याच्या इनिंगमुळेच श्रीलंकेने 162 धावसंख्या उभारली.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमालीच प्रदर्शन केलं. नेदरलँडसला त्यांनी 146 धावांवर रोखलं. बायो-बबलचा नियम मोडल्यामुळे कुसल मेंडीसला इंग्लंड दौऱ्यात टीमबाहेर करण्यात आलं होतं. त्याच्यावर एक वर्षाची बंदी सुद्धा घालण्यात आली होती.
Magical Mendis!
We can reveal that this 6 from Kusal Mendis is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos of the Game packs from Netherlands v Sri Lanka. Grab your pack from https://t.co/8TpUHbQQaa to own iconic moments from every game. pic.twitter.com/wmHcxgabBA
— ICC (@ICC) October 20, 2022
हसारंगाने दाखवून दिली क्षमता
श्रीलंकेकडून वानेंदु हसारंगाचा परफॉर्मन्स नेहमीच टॉप क्लास असतो. श्रीलंकन टीमच्या या लेग स्पिनरने पुन्हा एकदा 3 विकेट काढल्या. त्याने एकरमॅन, गुगटेन आणि क्लासेनची विकेट काढली. महीश तीक्ष्णाने 2 विकेट काढल्या.