मुंबई: काही दिवसांपूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World cup) साठी टीमची निवड झाली. त्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ला स्थान मिळालं नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) मायदेशात मालिका झाल्या, त्यासाठी सुद्धा पृथ्वीच्या नावाचा विचार झाला नाही. निवड समितीने दुर्लक्ष केलेला हा फलंदाज जणू संधीचीच वाट पाहत होता. सय्यद मुश्ताक अली टी 20 टुर्नामेंटमध्ये पृथ्वीला ती संधी मिळाली.
त्याने तुफानी शतक झळकावलं
तीन दिवसात दुसऱ्यांदा पृथ्वीने जबरदस्त प्रदर्शन केलय. यावेळी पृथ्वीची बॅट सुसाट चालली. त्याने तुफानी शतक झळकावलं. पृथ्वीने आसाम विरुद्ध स्फोटक बॅटिंग कशाला म्हणतात, ते दाखवून दिलं.
आसामच्या प्रत्येक गोलंदाजाची जोरदार धुलाई केली. मैदानाचा एक कोपरा सोडला नाही. प्रत्येक ठिकाणी त्याने चेंडू पोहोचवला. पृथ्वीने जोरदार धमाका करुन मैदानाच्या आत आणि बाहेर असलेल्या सिलेक्टर्सच लक्ष वेधून घेतलय.
Maiden hundred for Captain Prithvi Shaw in T20 format, hundred from 46 balls including 10 fours and 6 sixes, A knock to remember, What a player. pic.twitter.com/bokhoHDAPQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2022
पृथ्वी शॉ चं T20 मध्ये पहिलं शतक
पृथ्वी शॉ ने आसाम विरुद्ध 19 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकावली. 46 चेंडूत शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्याने 6 सिक्स आणि 10 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 210 च्या पुढे होता.
टी 20 क्रिकेटमध्ये पृथ्वीच हे पहिलं शतक आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये पृथ्वीचा हा तिसरा सामना होता. याआधी तो 2 सामने खेळलाय. एकामॅचमध्ये तो नाबाद 55 धावांची इनिंग खेळला.
शतकासोबतच भागीदारी
आसाम विरुद्ध पृथ्वी शॉ ने तुफानी बॅटिंग केलीच. पण यशस्वी जैस्वाल सोबत मिळून दुसऱ्याविकेटसाठी शतकी भागीदारी केली. शतक झळकवल्यानंतरही पृथ्वी शॉ थांबला नाही. आसामच्या गोलंदाजांची त्याने धुलाई सुरुच ठेवली.