मुंबई : भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने गोल्ड कॉस्टवर खेळवल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind vs Aus) ऐतिहासिक शतक झळकावले आहे. भारतीय महिला संघ प्रथमच डे-नाईट कसोटी सामना खेळत आहे आणि मानधनाने तिच्या शतकासह हा सामना संस्मरणीय बनवला आहे. मानधनाच्या कारकिर्दीतील हे पहिले कसोटी शतक आहे. तिने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. स्मृती मानधनाच्या कारकिर्दीतील हा चौथा कसोटी सामना होता. या सामन्यात तिने शानदार शतक झळकावले. यापूर्वी, कसोटीत तिची सर्वोत्तम धावसंख्या 78 होती, जी तिने या वर्षी इंग्लंडविरुद्ध केली होती. (Smriti Mandhana Becomes First Indian Woman to Score Test Century in Australia)
आपल्या कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळताना मानधनाने 170 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. या शतकी खेळीत तिने 18 चौकारही लगावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय डावातील 51.5 षटकात, तिने एलिस पेरीच्या चेंडूवर मिडविकेटवर चौकार मारून आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला कसोटी खेळाडू ठरली आहे.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूपासून मानधना आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई सुरु ठेवली. शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी तिने 93 धावांची भागीदारी करताना चौकारांचा वर्षाव केला. तिने केवळ 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. चाहते तिच्या शतकाची वाट पाहात होते पण पावसामुळे ही प्रतीक्षा खूपच वाढली. मानधानालाही सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठं जीवदान मिळालं. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात ती पेरीच्या चेंडूवर झेलबाद झाली. मात्र, गोलंदाज पेरीचा पाय रेषेच्या पुढे असल्याने पंचांनी नो बॉल दिला.
Maiden Test ton ✅
First #TeamIndia batter to score a ton in women’s Tests in Australia ✅
Drop an emoji in the comments ? & describe @mandhana_smriti‘s superb hundred. #AUSvIND
Follow the match ? https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/aL6wu59WLl
— BCCI Women (@BCCIWomen) October 1, 2021
पहिल्या डे-नाईट कसोटीत शतक झळकावणारी ती आता दुसरी भारतीय फलंदाज बनली आहे. तिच्या आधी भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता. 2019 मध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात कर्णधार कोहलीने शतक झळकावले. मात्र, तेव्हापासून त्याने एकही शतक ठोकलेलं नाही.
? for @mandhana_smriti! ? ?
Maiden Test ton for the #TeamIndia left-hander. ? ?
What a fantastic knock this has been! ? ? #AUSvIND
Follow the match ? https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/2SSnLRg789
— BCCI Women (@BCCIWomen) October 1, 2021
इतर बातम्या
ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा
धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास ‘Family Moment’
SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर
(Smriti Mandhana Becomes First Indian Woman to Score Test Century in Australia)