देशासाठी स्मृती मांधना लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

| Updated on: Sep 13, 2022 | 1:35 PM

भारताच्या अव्वल महिला क्रिकेटपटूमध्ये स्मृती मांधनाचा समावेश होतो. टीम इंडियाची ती प्रमुख आधारस्तंभ आहे. टीम इंडियासाठी आतापर्यंत तिने अनेकदा संकटमोचकाची भूमिका बजावली आहे.

देशासाठी स्मृती मांधना लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Smirti mandhana
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: भारताच्या अव्वल महिला क्रिकेटपटूमध्ये स्मृती मांधनाचा समावेश होतो. टीम इंडियाची ती प्रमुख आधारस्तंभ आहे. टीम इंडियासाठी आतापर्यंत तिने अनेकदा संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. तिच्या कामगिरीमुळेच भारताने अनेक सामने जिंकले आहे. हीच स्मृती मांधना आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. स्मृती भारताची स्टार क्रिकेटपटू आहे. तिला दीर्घकाळ टीम इंडियाकडून खेळायचं आहे.

वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचा मुद्दा

देशासाठी तिला अनेक किताब जिंकण्याची इच्छा आहे. त्यासाठी स्मृती लाखो रुपयांवर पाणी सोडायला तयार आहे. भारताची पुरुष आणि महिला टीम सध्या सातत्याने वेगवेगळ्या सीरीज खेळत आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचा मुद्दा आहे.

माघार घेण्याचा विचार

याच वर्कलोड मॅनेजमेंटसाठी स्मृती महिला बिग बॅश लीगमधून माघार घेण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन टीम इंडियाकडून खेळण्यासाठी ती फिट राहिलं. स्मृती मांधना फेब्रुवारीपासून सातत्याने क्रिकेट खेळतेय.

द हंड्रेड स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये थांबली

मागच्या महिन्यात ती कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळली. यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये महिला टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ती द हंड्रेड स्पर्धेसाठी ती इंग्लंडमध्येच थांबली. आता यजमान इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 सीरीजचा ती भाग आहे.

टीम इंडियाकडून खेळण्याची संधी सोडायची नाहीय

मानसिकपेक्षा शारीरिक तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे, असं स्मृतीने दुसऱ्या टी 20 मॅचआधी सांगितलं. त्यामुळेच ती महिला बिग बॅश लीगमधून माघार घेण्याचा विचार करत आहे. कारण टीम इंडियाकडून खेळण्याची एकही संधी तिला सोडायची नाहीय, देशासाठी खेळताना तिला पूर्ण फिटनेस ठेवायचा आहे. छोटीशी दुखापतही परवडणार नाही. देशासाठी तिला 100 टक्के योगदान द्यायचं आहे.