मुंबई : टीम इंडियाचा ओपन फलंदाज पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएंसर सपना गिल आणि तिच्या सहकाऱ्यांसोबत पृथ्वीचा झगडा झाला होता. मुंबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलात हा झगडा झाला होता. त्यानंतर पृथ्वीने सपना विरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे तिला अटकही करण्यात आली. आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. मात्र, या झगड्याचा एक व्हिडीओ सपनाकडे आहे. या व्हिडीओत त्या झगड्याचे भयंकर दृश्य कैद आहे. योग्यवेळी सपना गिल हा व्हिडीओ व्हायरल करणार असून पृथ्वीला एक्सपोज करणार आहे. तसा सूचक इशाराही तिने दिला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं सांगितलं जात आहे.
सपनाकडे एक असा व्हिडीओ आहे, ज्यामुळे पृथ्वी शॉची गैरवर्तवणूक समोर येईल. हा व्हिडीओ सपनाकडे आहे. तो कोर्टात सादर केला जाणार आहे. या व्हिडीओतून पृथ्वीपूर्णपणे एक्सपोज होईल असा दावा सपनाच्या वकिलाने केला आहे. सपनाकडे एक व्हिडीओ आहे. तो तिला बाहेर द्यायचा नाहीये. मीही तिला हा व्हिडीओ बाहेर व्हायरल करू नको म्हणून सांगितलं. या व्हिडितो पृथ्वीची गैरवर्तवणूक दिसतेय. पृथ्वी शोभितचा फोन खेचताना दिसत असून हा फोन फेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ बाहेर आल्यावर पृथ्वी शॉ चांगलाच एक्सपोज होईल. आणखीही काही गोष्टी बाहेर पडतील, असं सपनाच्या वकिलाने सांगितलं.
जर सपनाला प्रसिद्धीचा सोस असता तर तिने आधीच तो व्हिडीओ व्हायरल केला असता. तो व्हिडीओ कोर्टात पुरावा म्हणून दाखवायचा आहे. हे मी सपनाला आतापर्यंत दहावेळा सांगितलं आहे. एक वकील म्हणून तिने अजूनही मला तो व्हिडीओ दिला नाही. पण मी तो व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओत पृथ्वी शॉ चुकीच्या पद्धतीने वागताना स्पष्टपणे दिसत आहे, असं तिच्या वकिलाने सांगितलं. जर पबच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ बाहेर आला तर अनेक गोष्टींचा पर्दाफाश होईल. पृथ्वीच्या लोकांनीच सपनाच्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याचंही दिसून येईल, असंही त्यांनी सांगितलं.
प्लॅन करून मी या गोष्टी केल्या नाहीत. तो कोण आहे हे माल माहीत आहे, असं सपनाने सांगितलं. या प्रकरणात आता कोणतीही तडजोड होणार नाही. कारण मी हे सर्व सहन केलं आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल याचा विचार करा. माझं संपूर्ण आयुष्य खराब करून ठेवलं आहे. त्यामुळे तडजोडीचा प्रश्नच येत नाही, असंही तिने सांगितलं.
सांताक्रुझच्या फाईव्ह स्टार हॉटेलात हे संपूर्ण प्रकरण घडलं. पृथ्वी त्याच्या मित्रासोबत डिनरला गेला होता. त्यावेळी दोन लोकांनी पृथ्वीसोबत सेल्फी काढला. त्यानंतर ते लोक परत आले आणि काही आरोपींसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह त्यांनी धरला. पण पृथ्वीने त्याला नकार दिला. मित्रांसोबत मी जेवण करण्यासाठी आलोय. मला त्रास देऊ नका, असं पृथ्वीने सांगितलं. त्यामुळे दोन्हीकडून शाब्दिक चकमक उडाली अन् त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर पृथ्वीच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलीस ठाण्यात सपनासह आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.