थरारक मॅच, सुपर ओव्हरच्या लास्ट बॉलवर SIX मारुन विजय, पहा VIDEO

| Updated on: Oct 06, 2022 | 12:45 PM

श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या मॅचमध्ये अखेर टीमच्या कॅप्टनने पलटवली बाजी

थरारक मॅच, सुपर ओव्हरच्या लास्ट बॉलवर SIX मारुन विजय, पहा VIDEO
sophie devine
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा श्वास रोखून धरायला लावणारा सामना पहायला मिळतो. असाच एक रोमांचक सामना बुधवारी सर विवियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट टीमने वेस्ट इंडिजवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

कोण गोलंदाजी करत होतं?

शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला 4 धावांची गरज होती. कॅप्टन सोफी डिवाइनने मिडविकेटवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला. सोफी डिवाइनने वेस्ट इंडिजची कॅप्टन हेली मॅथ्यूजच्या चेंडूवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला.

मॅच सुपरओव्हरमध्ये का गेली?

न्यूझीलंडच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 111 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी 4 धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज हेली जेनसनने 6 चेंडूत 3 धावा देऊन 2 विकेट काढल्या. त्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली.

असा होता सुपर ओव्हरचा रोमांच

न्यूझीलंडसाठी सुपरओव्हर जेनसननेच टाकली. वेस्ट इंडिजकडून मॅथ्यूज आणि मॅक्लीन क्रीजवर आले होते. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. जेनसनने पहिला चेंडू वाइड टाकून पाच धावा दिल्या. त्यानंतर मॅक्लीनने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा करुन वेस्ट इंडिजच्या टीमने 15 धावाच केल्या.

सोफी डिवाइनची हिटिंग

सुपर ओव्हरमध्ये सोफी डिवाइन आणि सूजी बेट्स क्रीजवर आले होते. वेस्ट इंडिजची कॅप्टन हॅली मॅथ्यूज गोलंदाजी करत होती. मॅथ्यूजच्या पहिल्या चेंडूवर डिवाझनने षटकार मारला. त्यानंतर मॅथ्यूजने न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.

शेवटच्या बॉलवर न्यूझीलंडला 4 धावांची गरज होती. मॅथ्यूजने डिवाझनला शरीरवेधी चेंडू टाकला. त्यावर तिने मिडविकेटला सिक्स मारुन सामन्यासह सीरीज जिंकली.