नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्ससाठी मागचा सीजन खास नव्हता. या सीजनमध्येही दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली आहे. या टीमचा कॅप्टन ऋषभ पंतच्या गाडीला मागच्या आठवड्यात मोठा अपघात झाला. त्यामुळे ऋषभला पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागणार आहे. आयपीएलमध्ये तो खेळेल की, नाही, या बद्दल आत्ताच काही ठामपणे सांगता येणार नाही. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला आपल्यासोबत जोडलं आहे. आयपीएल 2023 साठी बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची टीमच्या संचालकपदी निवड करण्यात आलीय.
सौरव गांगुलीवर आणखी कुठल्या टीम्सची जबाबदारी
पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. आयपीएलशी संबंधित सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. सौरव गांगुलीने ऑक्टोबरमध्ये बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सौरव गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सचा संचालक असेल. त्याशिवाय या फ्रेंचायजीच्या दुबई कॅपिटल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स टीम्सची जबाबदारी संभाळेल. दिल्ली कॅपिटल्सने दुबई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगमधील संघ विकत घेतलेत.
आधी सुद्धा भाग होता
सौरव गांगुली यावर्षी दिल्ली कॅपिटल्समधून पुनरागमन करेल. फ्रेंचायजी आणि त्याच्यामध्ये या संदर्भाच चर्चा झालीय. त्याने या फ्रेंचायजीसोबत काम केलय. आयपीएलमध्ये त्याला काम करायच असेल, तर ती दिल्ली कॅपिटल्सची टीम असेल. आयपीएलशी संबंधित सूत्राने गोपनियतेच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली.
याआधी सुद्धा मेंटॉर होता
गांगुली 2019 साली दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर होता. अलीकडेच झालेल्या लिलावात फ्रेंचायजीने मुख्य कोच रिकी पॉन्टिंग आणि गांगुलीने दिलेल्या सल्ल्याच पालन केलं.
काही वादही झाले
सौरव गांगुली ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष झाला. गांगुलीच्या कार्यकाळात काही वादही झाले. सौरव आणि विराट कोहलीमध्ये मतभेदाच्या बातम्या समोर आल्या.