सौरव गांगुलीकडे इतक्या कोटींची संपत्ती, निवृत्तीनंतर ही अशी करतो करोडोंची कमाई

| Updated on: Jul 08, 2024 | 4:09 PM

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची लाईफस्टाईल खूपच वेगळी आहे. त्यांची गणना अनेक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत केली जाते. सौरव गांगुलीच्या घराचीच किंमत करोडोंमध्ये आहे. त्यांच्याकडे मोठी संपत्ती आहे. आजही तो करोडो रुपये कमवत आहे.

सौरव गांगुलीकडे इतक्या कोटींची संपत्ती, निवृत्तीनंतर ही अशी करतो करोडोंची कमाई
Follow us on

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचा आज वाढदिवस आहे. सौरव गांगुली याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. भारताचा हा दिग्गज खेळाडू देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. सौरव गांगुलीकडे आलिशान घरे आणि अनेक आलिशान कार आहेत. तो आजही राजेशाही जीवन जगतो. सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. चला आज जाणून घेऊया त्यांचा खास जीवनशैलीबद्दल.

10 कोटींचा बंगला

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बंगालचा राजा म्हटले जाते. गांगुली हा कोलकात्यात राहतो. गांगुलीचे घर महालापेक्षा कमी नाही. त्याच्या घराची किंमत ही 10 कोटी रुपये आहे. गांगुलीचे घर सुमारे ६५ वर्षे जुने आहे. घरात अनेक आधुनिक सुविधा आहेत. सौरव गांगुली हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. घर एखाद्या राजवाड्यासारखे आहे. घरात एकूण 48 खोल्या आहेत, जिथे तो त्याची पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुलीसोबत राहतो. त्यांचे घर कोलकात्यातील एक विशेष ठिकाण म्हणून ओळखले जाते. सौरव गांगुलीच्या घरात क्रिकेटची खेळपट्टीही आहे जिथे तो नेटवर सराव करतो.

लंडनमध्ये ही गांगुलीचे घर

सौरव गांगुलीने लंडनमध्ये देखील 2 बीएचके फ्लॅट घेतला आहे. ज्याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. सौरव गांगुली जेव्हा लंडनला असतो तेव्हा तो याच घरात राहतो. सौरव गांगुलीने कोलकात्याच्या लोअर रोडन स्ट्रीटवर एक नवीन बंगलाही खरेदी केलाय. त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे.

आलिशान कारचा शौकीन

सौरव गांगुलीकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. मर्सिडीज आणि रेंज रोव्हरसारख्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुलीकडे 72 लाख रुपयांची मर्सिडीज कार, 62 लाख रुपयांची रेंज रोव्हर, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि सीएलके कन्व्हर्टिबल सारख्या कार आहेत. एका रिपोर्टनुसार, सौरव गांगुलीला मर्सिडीज कारमध्ये प्रवास करायला आवडते. त्याच्याकडे जवळपास 20 मर्सिडीज गाड्या आहेत.

गांगुलीची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली दरवर्षी 25 कोटी रुपये कमावतो. सौरव गांगुलीची एकूण संपत्ती 750 कोटी रुपये आहे. गांगुली विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून आता कमाई करतो. याशिवाय त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक देखील केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली एका जाहिरातीसाठी सुमारे 1 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो टीव्ही शो होस्ट करूनही पैसे कमावतो.

गांगुलीची कारकीर्द

सौरव गांगुलीने भारतीय संघासाठी 113 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतके ठोकली आहेत. यामध्ये एकूण त्याने 7212 धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या २३९ धावा आहे.गांगुलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 311 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11363 धावा केल्या आहेत. गांगुलीच्या नावावर 22 शतके आणि 72 अर्धशतके आहेत. सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट खेळला नाही पण त्याने आयपीएलमध्ये 59 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1349 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 7 अर्धशतकेही आहेत.