धोनी की गांगुली, सर्वोत्तम कर्णधार कोण? सेहवागने एकाच शब्दात ठासून सांगितलं!

| Updated on: Sep 15, 2021 | 1:02 PM

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एम एस धोनी  (M S Dhoni) यांची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. या दोघांनी टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक यशाचे टप्पे गाठले.

धोनी की गांगुली, सर्वोत्तम कर्णधार कोण? सेहवागने एकाच शब्दात ठासून सांगितलं!
dhoni_sehwag_Ganguly
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एम एस धोनी  (M S Dhoni) यांची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. या दोघांनी टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक यशाचे टप्पे गाठले. टीम इंडिया परदेशात जिंकू शकते हा विश्वास गांगुलीने दिला. तर धोनीच्या नेतृत्त्वात भारताने टी 20 आणि वन डे वर्ल्डकप जिंकले. या दोघांच्याही नेतृत्त्वात टीम इंडिया माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग खेळला आहे. आता गांगुली की धोनी सर्वोत्तम कर्णधार कोण या प्रश्नाचं उत्तर सेहवागने दिलं आहे.

वीरेंद्र सेहवागने एक मुलाखतीत या प्रश्नांचं उत्तर दिलं. आर जे रौनकच्या यूट्यूब शोमध्ये सेहवागने बिनधास्त उत्तरं दिली. सेहवाग म्हणाला, गांगुली आणि धोनी हे दोघेही उत्तम कर्णधार होते. मात्र ज्या काळात गांगुलीने नेतृत्व केलं, त्यामुळे सौरव गांगुली बेस्ट कर्णधार ठरतो, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. “गांगुलीने एक टीम उभी केली. नव्या दमाच्या आणि हरहुन्नरी खेळाडूंना संधी देऊन टीमची बांधणी केली. गांगुलीने भारताला परदेशात विजय मिळवून दिले. आम्ही कसोटी मालिका ड्रॉ करु शकलो, जिंकू शकलो” असं सेहवागने सांगितलं.

धोनी की गांगुली?

गांगुलीनेच सेहवागला कसोटीतही सलामीला फलंदाजीला संधी दिली. त्यामुळे सेहवागने त्रिशतकं ठोकण्याची कामगिरी केली. तर धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया दोनवेळा विश्वविजेती बनल्याची आठवणही सेहवागने करुन दिली.

गांगुलीने युवा आणि प्रतिभाशाली खेळाडूंची निवड केली आणि संघ मजबूत केला. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेटमधील नव्या पर्वाला सुरुवात झाली, असं सेहवाग म्हणाला.

गांगुली सर्वोत्तम 

धोनीने चांगलं काम केलं. त्याने ही टीम योग्य पद्धतीने पुढे नेली. धोनीला एक चांगली टीम मिळाली, त्या टीमच्या जोरावर त्याने यश मिळवून दिलं, असं सेहवागने सांगितलं. धोनीला टीम मिळाल्यामुळे नव्याने सुरुवात करण्याची गरज भासली नाही. पण गांगुलीला टीम तयार करावी लागली. त्यामुळे मला वाटतं धोनी आणि गांगुली यांच्यात सर्वोत्तम कर्णधार निवडायचं झाल्यास मी गांगुलीचं नाव घेईन, असं सेहवागने ठासून सांगितलं.

संबंधित बातम्या

Ravi Shastri : टी 20 वर्ल्ड कपनंतर कोच कोण? सौरव गांगुलीचे मोठे संकेत

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’