T20 संघाच कर्णधारपद विराटने सोडल्यावर गांगुलीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

| Updated on: Oct 22, 2021 | 9:57 PM

विराट कोहली भारतीय टी20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. ही माहिती त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना दिली होती.

T20 संघाच कर्णधारपद विराटने सोडल्यावर गांगुलीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
सौरव गांगुली
Follow us on

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय टी -20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती समोर येऊन आता बराच काळ झाला आहे. आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली होती. दरम्यान आता इतक्या दिवसानंतर अखेर बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली (sourav ganguly) याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गांगुली म्हणाला त्याला जेव्हा याबाबत कळाले आधीतर तो खूप चकीत झाला. त्यानंतर बोलताना त्याने भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) विराटवर कोणतीच जबरदस्ती केली नसल्याचं सांगितलं. हा संपूर्णपणे त्याचा निर्णय असल्याचंही तो म्हणाला. गांगुलीने इंडिया टुडेसोबत बोलताना माहिती दिली की,“विराट कोहलीने जेव्हा टी20 संघाच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला ते ऐकून मी हैराण झालो. पण हा संपूर्णपणे त्याचा स्वत:चा निर्णय़ होता. आमच्याकडून कोणताच दबाव त्याच्यावर नव्हता. मी स्वत: कर्णधार राहिलो असल्याने मी समजू शकतो इतक्या काळापर्यंत तिन्ही प्रकारात कर्णधारपद भूषवणं किती कठीण आहे.”

‘कर्णधारपद दिसायलाच भारी वाटतं’

पुढे बोलताना गांगुली म्हणाला, ”मी सहा वर्ष संघाचा कर्णधार होतो. हे बाहेरुन पाहायला चांगलं वाटतं पण आतून तुम्ही फार थकलेले असता. सततच्या भारामुळे त्रास होतो. हे फक्त गांगुली, धोनी, तेंडुलकर किंवा विराटच नाही. तर भविष्यात जोही कर्णधार येईल त्याच्यासोबतही होणार आहे.”

विराटचं टी20 कर्णधारपद

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 45 टी -20 सामने खेळले आहेत आणि त्यातील 29 सामने जिंकले आहेत. केवळ 13 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची टक्केवारी 65.11 इतकी आहे. 2017 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो टी – 20 संघाचा कर्णधार बनला. तसेच, 2021 टी 20 विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी टी-20 स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर कोहली कर्णधारपदावरून पायउतार होईल.

हे ही वाचा-

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

(Sourav ganguly says he was surprised with virat kohli decision to quit captaincy)