मुंबई : कसोटी क्रिकेटमधील सर्वात मानाच्या सामन्याला 18 जूनपासून भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सुरुवात होणार आहे. भारताचे शिलेदार संपूर्ण सराव आणि दिग्गजांचे सल्ले घेऊन सामन्यांत न्यूझीलंडशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार, भारतीय क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) देखील टीम इंडियाला काही मोलाचे सल्ले दिले आहेत. पण त्याने दोन खेळाडूंवर सामना सर्वाधिक अवलंबून असल्याचं महत्त्वाचं विधान केलं आहे. गांगुली आज तकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात बोलत होता. (Sourav Ganguly says Opener Rohit Sharma And Shubhman Gill Role is Important in ICC World Test Championship against New Zealand)
सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी एका मजबूत ओपनिंग भागिदारीची गरज असल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. परदेशात खेळताना भारतीय संघाकडून सलामीवीरांची जबाबदारी महत्त्वाची असते. याआधी वीरेंद्र सेहवाग होता जो ही कामगिरी चोख पार पाडायचा. त्यामुळे आता अनुभवी रोहित शर्मा आणि युवा फललंदाज शुभमन गिलने हे शिवधनुष्य पेलणे गरजेचे असल्याचं गांगुली म्हणाला. तसच या दोघांनी चांगला खेळ करत सुरुवात केल्यास पुढील फलंदाजानाही फलंदाजी करण सोपं जाईल असंही गांगुली म्हणाला.
गांगुलीने परदेशी खेळपट्टीवर खेळताना तणाव असण साहजिकंच असल्याचं सांगितल. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी मिळाल्यास भारत मोठी धावसंख्या निर्माण करुन तणावमुक्त होऊ शकतो. असं गांगुली म्हणाला. तसंच मोठे आणि महत्त्वाचे सामने हे तणावाखालीच जिंकले जातात असंही गांगुली म्हणाला.
WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव
भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर
WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज
(Sourav Ganguly says Opener Rohit Sharma And Shubhman Gill Role is Important in ICC World Test Championship against New Zealand)