ODI World cup 2023 : एकवेळ क्रिकेट विश्वावर वेस्ट इंडिजच राज्य होतं. त्यांनी दोनवेळा वनडे वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली. पण आता त्याच वेस्ट इंडिजची हालत खराब झालीय. त्यांच्यासाठी थेट वनडे वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करणं सुद्धा मुश्किल झालय. कधीकाळी क्रिकेट विश्वावर एकछत्री अमल करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या टीमला ते यंदाच्या 2023 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की, नाही, हे त्यांनाच ठाऊक नाहीय.
वेस्ट इंडिजच्या टीमला भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवता आलेला नाहीय. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सच्या टीमवर मिळवलेल्या विजयाने वेस्ट इंडिजचा झटका बसला.
वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम कितव्या स्थानावर?
दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्स विरुद्धची 3 सामन्यांची वनडे सीरीज 2-0 ने जिंकली. ही सीरीज वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग होती. या सीरीज विजयासह दक्षिण आफ्रिकेची टीम वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये 8 व्या स्थानावर पोहोचलीय. त्यांचा वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश पक्का झालाय.
अजूनही क्वालिफायची संधी
वेस्ट इंडिज टीमची 9 व्या स्थानावर घसरण झाली आहे. कॅरेबियाई टीमचा वर्ल्ड कपचा प्रवास संपलेला नाही. त्यांना वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी अजूनही संधी आहे. वेस्ट इंडिजच्या टीमला आता झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर सामने खेळावे लागतील. बांग्लादेश आणि आयर्लंडच्या टीममध्ये मे महिन्यात वनडे सीरीज खेळली जाणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वनडे वर्ल्ड कप प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल. कारण बांग्लादेश विरुद्ध आयर्लंड सीरीजमुळेही दक्षिण आफ्रिकेच समीकरण बिघडू शकतं.
आयर्लंड हरल्यास दक्षिण आफ्रिकेच काय होईल?
आयर्लंडचा आणखी एक पराभव झाल्यास दक्षिण आफ्रिका टीमच्या समावेशावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधील 8 वी टीम असेल. अन्य 2 टीम्सचा निर्णय जून महिन्यात होणाऱ्या क्वालिफायर्सवर अवलंबून आहे. यात वेस्ट इंडिज सोबत श्रीलंकेची टीम सुद्धा सहभागी होईल.