लाहोर : दक्षिण आफ्रीकेचा सलामीवीर फाफ डु प्लेसी (Faf Du Plessis) सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) क्वेटा ग्लेडिएटर्स या संघाकडून खेळतो.
क्वेटा ग्लेडिएटर्स आणि पेशावर जल्मी यांच्यातील सामन्या दरम्यान क्षेत्ररश्रण करताना चौकार अडवण्याच्या प्रयत्नात डु प्लेसीला सहखेळाडू मोहम्मद हुसेन याचा गुडघा लागला. डोक्याला जोरात गुडघा लागल्याने डु-प्लेसी पुढील सामना खेळू शकला नाही. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर काही काळासाठी त्याची स्मृती गेली होती असं स्वत: त्याने सांगितलं. (South Africa Cricketer Faf Du Plessis Says he Suffered some Memory Loss due to concussion in PSL 2021)
फाफ डु प्लेसीने ट्वीट करत काय़ घडल ते सांगितल. त्याने आपल्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती देखील दिली. डु प्लेसीने ट्विटमध्ये धन्यवाद देत लिहिले, ‘मे हॉटेलला परतलो आहे आता माझी प्रकृती ठिक आहे. फक्त दुखापत झाल्यानंतर काही काळ मला काही आठवत नव्हते. पण आता मी पूर्णपणे ठिक होईन आणि लवकरच संघासाठी खेळेन.’ डु प्लेसीच्या सामन्यातून बाहेर जाण्यामुळे
त्याच्या संघाला फलंदाजीत नुकसान सहन करावे लागले. ज्यामुळे त्याच्या संघाला 61 धावांनी पराभव पत्करावा लागला.
Thank you everyone for all the messages of support. I’m back at the hotel recovering. Have concussion with some memory loss but I will be fine. Hopefully be back on the field soon. Much love. ❤️
— Faf Du Plessis (@faf1307) June 13, 2021
फाफ डु प्लेसी आयपीएलमधील लोकप्रिय टीम चेन्नई सुपरकिंगचा सलामीवर आहे. चेन्नईला प्रत्येक सामन्यात मजबूत आघाडी घेण्यासाठी सुरुवातीपासून धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजी वेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण करणआरा डु प्लेसी संघाचा हुकुमी एक्का आहे. कोरोनामुळे स्थगित झालेली आयपीएल लवकरच युएईत सुरु होणार असल्याने स्पर्धेसाठी प्रेक्षकांसह खेळाडूही व्यस्त आहेत.
हे ही वाचा :
या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
(South Africa Cricketer Faf Du Plessis Says he Suffered some Memory Loss due to concussion in PSL 2021)