मुंबई: क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार पहायला मिळतात. एकापेक्षा एक सरस शॉट्स खेळले जातात. गोलंदाजांचे काही चेंडू कमालीचे असतात. त्यात फलंदाज फारकाही करु शकत नाही. त्यांना पॅव्हेलियनची वाट पकडावी लागते. एकूणच क्रिकेटच्या मैदानात टोटल एंटरटेनमेंट असतं. पण काहीवेळा क्रिकेटच्या मैदानात अशा सुद्धा घटना होतात, ज्यामुळे काळीज हेलावून जातं. खेळाडू, प्रेक्षक हळहळतात.
काहीवेळा मॅचमध्ये एखाद्याला गंभीर दुखापत होते. मृत्यूसुद्धा होतो. इंग्लंडमध्ये T20 मॅच दरम्यान अशीच एक घटना घडली. मैदानात फिल्डरच्या थ्रो मुळे कबुतराचा मृत्यू झाला.
कुठल्या टीम्समध्ये सुरु होता सामना?
लँकेशायर आणि यॉर्कशायरमध्ये हा सामना सुरु होता. लँकेशायरची फलंदाजी सुरु होती. इनिंगच्या 11 व्या ओव्हरमध्ये लँकेशायरचा फलंदाज एश्वेल प्रिन्सने मिडविकेटला शॉट मारला. त्याने दोन धावा काढल्या. त्यावेळी फिल्डर जॅक रुडॉल्फने चेंडू अडवला व थ्रो केला. हा थ्रो हवेत उडणाऱ्या एका कबुतराला लागला.
थ्रो इतका जोरात होता की, चेंडू लागताच कबुतर जमिनीवर कोसळलं. मैदानात तडफडून या कबुतराने प्राण सोडले.
दक्षिण आफ्रिकन खेळाडूचा थ्रो
जॅक रुडॉल्फने जाणूनबुजून कबुतराला चेंडू मारला नाही. त्याने नेहमीसारखा थ्रो फेकला होता. पण दुर्देवाने चेंडू हवेत उडणाऱ्या कबुतराला लागला. हे दृश्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक जोरात ओरडले. आधी समजलं नाही, नेमकं काय झालय. पण रिप्लेमध्ये जॅकच्या थ्रोमुळे कबुतराचा मृत्यू झाल्याच लक्षात आलं.
जॅक रुडॉल्फ हसत होता
हा प्रसंग पाहून अनेकजण हळहळले. पण थ्रो करणारा जॅक रुडॉल्फ मात्र हसत होता. कबुतराचा मृत्यू झाला. पण रुडॉल्फ हसत होता. लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान एक कॉमेंटेटर म्हणाला की, जॅक रुडॉल्फच्या हाताला कबुतराच रक्त लागलय. या थ्रो नंतर पंचांनी तो चेंडू डेड ठरवला. म्हणजे दुसऱ्यांदा गोलंदाजाला तो चेंडू टाकावा लागला.
कोण आहे जॅक रुडॉल्फ?
जॅक रुडॉल्फ दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याने 48 टेस्ट मॅचेसमध्ये 6 शतकं झळकावली आहेत. त्याने एकूण 2622 धावा केल्यात. वनडेमध्ये 39 इनिंग्समध्ये 1174 धावा ठोकल्या आहेत. रुडॉल्फने वनडेमध्ये एकूण 7 अर्धशतक झळकावली आहेत. फर्स्ट क्लास करीयरमध्ये रुडॉल्फच्या नावावर 51 सेंच्युरी आहेत.