सेंच्युरियन: सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. 2018 पासून भारताची वेगवान गोलंदाजी एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. वेग आणि अचूकतेच्या बळावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या मनात आपला धाक निर्माण केला आहे. मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि आता मोहम्मद सिराज याची चौकडी परदेशातील खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी करत आहे. (South Africa vs India Pacers don’t see India batsmen as teammates at nets, they frighten us KL Rahul)
फक्त प्रतिस्पर्ध्यांनाच भीती वाटत नाही, तर…
“फक्त प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांच्या मनातच भारताच्या वेगवान गोलंदाजांचा धाक नाहीय, तर स्वसंघातील फलंदाजांनाही नेटमध्ये सराव करताना त्यांची धास्ती वाटते” असे राहुलने सांगितले. नेटमध्ये भारतीय फलंदाजांनाही त्यांची भीती वाटते, असे निवनियुक्त टेस्टचा उपकर्णधार केएल राहुलने सांगितले.
मालिकेत आघाडी
भारताने सेंच्युरियवर पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवल्यानंतर केएल राहुलने भारतीय गोलंदाजीबद्दल हे वक्तव्य केलं. राहुलचे शतक त्यानंतर शामी, बुमराह आणि सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 113 धावांनी विजय मिळवून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
“नेटमध्ये शामी, सिराज, बुमराह यांच्या गोलंदाजीचा सामना करणं सोपं नसतं. तिथे उलट अधिक अवघड असतं. नेटमध्येही ते आम्हाला घाबरवून सोडतात. नेटमध्ये ते आमच्याकडे संघसहकारी म्हणून पाहत नाहीत. ते खूपच स्पर्धक क्रिकेटर्स आहेत” अशा शब्दात केएल राहुलने भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या ताफ्याचं कौतुक केलं.
संबंधित बातम्या:
Ajinkya Rahane: मराठमोळ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला अजून एक चान्स मिळेल?
IND VS SA: सचिनला तेंडुलकरला फोन फिरवं, गावस्करांचा विराट कोहलीला प्रेमाचा सल्ला
U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला भिडणार
(South Africa vs India Pacers don’t see India batsmen as teammates at nets, they frighten us KL Rahul)