SA vs IRE: भारतासमोर फ्लॉप पण आता ठोकले 12 सिक्स-फोर, धोनीच्या सहकाऱ्यालाही धुतलं, पहा VIDEO

| Updated on: Aug 04, 2022 | 12:32 PM

SA vs IRE: इंग्लंडला वनडे सीरीज मध्ये हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळतोय. सीरीज मधला पहिला सामना ब्रिस्टल मध्ये खेळला गेला.

SA vs IRE: भारतासमोर फ्लॉप पण आता ठोकले 12 सिक्स-फोर, धोनीच्या सहकाऱ्यालाही धुतलं, पहा VIDEO
sa vs ire
Image Credit source: Screengrab
Follow us on

मुंबई: इंग्लंडला वनडे सीरीज मध्ये हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळतोय. सीरीज मधला पहिला सामना ब्रिस्टल मध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 21 धावांनी जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. डावखुरा फलंदाज लॉर्कन टकरने स्फोटक फलंदाजी करुन दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा टप्पा बिघडवून टाकला. या फलंदाजाने 38 चेंडूत 78 धावा फटकावल्या.

लॉर्कन टकरची कमाल

लॉर्कन टकर तिसऱ्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला. कॅप्टन एंड्रयू बलर्बिनी आऊट झाल्यानंतर टकरने क्रीजवर पाऊल ठेवलं. त्याने मैदानावर येताच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली. पावरप्ले मध्ये त्याने तुफान फटकेबाजी केली. आपल्या हाय बॅकलिफ्टचा उपयोग करुन 5 षटकार आणि 7 चौकार खेचले. त्याचा स्ट्राइक रेट 205 पेक्षा जास्त होता. आयर्लंडचा हा खेळाडू इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा टी 20 चा सामना खेळतोय.

दोन्ही मॅच मध्ये तो फ्लॉप ठरला होता

टकरला दुसऱ्या फलंदाजाची साथ मिळाली नाही. मिडल ऑर्डरमधील फलंदाज हॅरी टॅक्टर आणि डेलानी लवकर आऊट झाले. कर्टिस कॅफरनेही खात उघडलं नाही. जॉर्ज डॉकरेलने 28 चेंडूत 43 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे लक्ष्य दिले होते. आयर्लंडचा संघ हे आव्हान पार करु शकला नाही. टकर भारतीय संघाविरोधात दोन सामने खेळला होता. या दोन्ही मॅच मध्ये तो फ्लॉप ठरला होता. टकर भारताविरोधात 18 आणि 5 धावांची इनिंग खेळला होता. दक्षिण आफ्रिकेचा ड्वेन प्रिटोरियस सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 44 धावा दिल्या. प्रिटोरियस चेन्नई सुपरकिंग्ससाठी आयपीएल मध्ये खेळतो.