SA vs WI T20 : T20 क्रिकेटमध्ये अनेकदा गोलंदाजांची धुलाई होते. सेंच्युरियनच्या स्टेडियममध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात जे घडलं, त्यात गोलंदाजांचा पार पालापाचोळा झाला. दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग करताना 258 धावा ठोकल्या. खरंतर वेस्ट इंडिजने टी 20 मॅचमध्ये धावांचा डोंगर उभारला होता. वेस्ट इंडिज हरेल, असा विचारही कोणी केला नव्हता. पण असं घडलं.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमने फक्त 4 विकेट गमावून 7 चेंडूआधीच विजयी लक्ष्य गाठलं. गोलंदाजांची कशी धुलाई झाली, ते जाणून घ्या.
एकूण 13 गोलंदाजांनी बॉलिंग केली
सेंच्युरियनच्या टी 20 मॅचमध्ये एकूण 13 गोलंदाजांनी बॉलिंग केली. यात 12 बॉलर्सचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 पेक्षा जास्त होता. फक्त कागिसो रबाडा असा एकमेव गोलंदाज होता, ज्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 पेक्षा कमी होता. मार्को जॅनसेन आणि मगालाने आपल्या 4 ओव्हरच्या कोट्यात 50 पेक्षा जास्त धावा दिल्या. या मॅचमध्ये अनेक आश्चर्यकारक आकडे पहायला मिळाले.
याआधी 515 धावांचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या टीमने मिळून या मॅचमध्ये 517 धावांचा पाऊस पाडला. हा पहिला असा टी 20 सामना आहे, जिथे दोन्ही टीम्सनी मिळून 500 चा आकडा गाठला. याआधी 515 धावांचा रेकॉर्ड मुल्तान सुल्तांस और क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या नावावर होता. पण ती पीएसएलची मॅच होती.
81 फोर-सिक्स
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील या मॅचमध्ये एकूण 35 सिक्स मारण्यात आले. टी 20 इंटरनॅशनल मॅचमधील हा एक रेकॉर्ड आहे. या मॅचमध्ये एकूण 81 फोर-सिक्स मारण्यात आले.
15 चेंडूत अर्धशतक
वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने 46 चेंडूत 118 धावा फटकावल्या. पण त्याच्या या खेळीवर क्विंटन डि कॉकच शतक भारी पडलं. क्विंटन डिकॉक आणि त्याचा ओपनिंग जोडीदार रीजा हॅड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. डिकॉकने 44 चेंडूत 100 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि 8 षटकार होते. डिकॉकने या मॅचमध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
पावरप्लेमध्ये 102 रन्स
वेस्ट इंडिजने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना दमदार सुरुवातीची गरज होती. डिकॉक आणि हेड्रिक्सने मिळून तशी सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152 धावा जोडल्या. त्यांनी पावरप्लेमध्ये 102 धावा ठोकल्या. टी 20 इंटरनॅशनमलध्ये पावरप्लेमध्ये कुठल्याही टीमने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
वेस्ट इंडिजकडून सिक्सचा रेकॉर्ड
वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये एकूण 22 सिक्स मारले. टी 20 इंटरनॅशनलच्या एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या रेकॉर्डची त्यांनी बरोबरी केली.