IND vs SA 1st ODI: व्हॉट ए कॅच, टेंबा बावुमाने घेतलेली ‘ही’ जबरदस्त कॅच तुम्ही पाहिलीत का? VIDEO

| Updated on: Oct 07, 2022 | 12:09 PM

IND vs SA 1st ODI: बॅट नाही पण फिल्डिंगमध्ये बावुमाने कमाल केली, 'या' कॅचची सर्वत्र चर्चा आहे

IND vs SA 1st ODI: व्हॉट ए कॅच, टेंबा बावुमाने घेतलेली ही जबरदस्त कॅच तुम्ही पाहिलीत का? VIDEO
teamba-bavuma
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: T20 सीरीजनंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आता वनडे मालिका सुरु झाली आहे. काल लखनौमध्ये पहिला वनडे सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने 9 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे हा सामना 50 ऐवजी 40 षटकांचा खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम बॅटिंग करताना 249/4 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून कोणी किती धावा केल्या?

टीम इंडियाला 240 धावाच करता आल्या. संजू सॅमसनची 63 चेंडूतील 86 धावांची खेळी व्यर्थ ठरली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डि कॉकने 54 चेंडूत 48 धावा, क्लासेन 65 चेंडूत 74 धावा आणि डेविड मिलर 63 चेंडूत 75 धावा केल्या.

टीम इंडियाची खराब सुरुवात

दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. 5.1 षटकात भारताच्या 8/2 धावा झाल्या होत्या. शिखर धवन 4 आणि शुभमन गिल 3 दोन्ही ओपनर्स स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाला फटका

श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 50 धावा, संजू सॅमसन 63 चेंडूत 86 धावा आणि शार्दुल ठाकूर 31 चेंडूत 33 धावा यांनी विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. डेथ ओव्हर्समध्ये झटपट गेलेल्या विकेटसचा टीम इंडियाला फटका बसला.

टेंबा बावुमाची जबरदस्त कॅच

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने या मॅचमध्ये जबरदस्त कॅच घेतली. खराब फलंदाजीमुळे त्याच्यावर टीका सुरु होती. फिल्डिंगमध्ये त्याने चांगली कामगिरी करुन ती कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला. 38 व्या ओव्हरमध्ये त्याने कुलदीप यादवचा जबरदस्त कॅच घेतला.

लुंगी निगिडीने स्लोअर वन टाकला. कुलदीपने लॉफ्टेड ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टेंबा बावुमाने मागे पळत जाऊन जबरदस्त कॅच घेतली.