IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध इतिहास रचला आहे. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या 6 ओव्हरमधील पॉवरप्लेमध्ये विक्रमी 125 धावा ठोकल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर होता. IPL 2017 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 6 ओव्हरमध्ये 105 धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्मा याने 12 बॉलमध्ये 46 धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडने 32 बॉलमध्ये 89 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 11 फोर आणि 6 सिक्स मारले. सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे.
पॅट कमिन्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकले. चेन्नई सुपर किंग्ज या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 100 धावा केल्या होत्या.
आयपीएल 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या 6 ओव्हरमध्ये 90 धावा केल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवून 88 धावा केल्या.
125/0 – SRH vs DC, 2024*
105/0 – KKR vs RCB, 2017
100/2 – CSK vs PBKS, 2014
90/0 – CSK vs MI, 2015
88/1 – KKR vs DC, 2024*
टी-20 क्रिकेटमधील देखील हा सर्वाधिक स्कोर आहे. हैदराबादने आतापर्यंत 13 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 184 रन केले आहेत. दिल्लीकडून आतापर्यंत कुलदीप यादवने 3 विकेट तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.