आयपीएलच्या साखली फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील 55 व्या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर इशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. इशान किशनच्या 84 आणि सूर्यकुमार यादवच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकात 193 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईने या सामन्यात 42 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 14 गुण मिळवले आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट कोलकात्यापेक्षा कमी असल्यामुळे मुंबई प्ले ऑफसाठी क्वालिफाय होऊ शकले नाहीत. मुंबईचा नेट रनरेट 0.12 आहे तर कोलकात्याचा नेट रनरेट 0.58 इतका आहे.
नॅथन कुल्टर नाईलने मुंबईला 8 विकेट मिळवून दिली आहे. त्याने रिद्धीमान साहाला 2 धावांवर असताना स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद बाद (हैदराबाद 182/2)
जसप्रीत बुमराहने मुंबईला 7 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने राशिद खानला (9) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (177/7)
नॅथन कुल्टर नाईलने मुंबईला 6 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने जेसन होल्डरला (1) ट्रेंट बोल्टकरवी झेलबाद केलं.
जेम्स निशमने मुंबईला चौथं यश मिळवून दिलं आहे. त्याने अब्दूल समदला शून्यावर कायरन पोलार्डकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 100/4)
पिषुष चावलाने मुंबईला तिसरं यश मिळवून दिलं आहे. त्याने मोहम्मद नबीला 3 धावांवर असताना कायरन पोलार्डकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 97/3)
हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे. जेम्स निशमने अभिषेक शर्माला 33 धावांवर असताना कुल्टर नाईलकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 79/2)
हैदराबादच्या सलामीवीरांनी शानदार पलटवार केला आहे. जेसन रॉय आणि अभिषेक शर्माने 4.5 षटकात धावफलकावर 60 धावा झळकावल्या आहेत. पाचव्या षटकात अभिषेक शर्माने सलग तीन चौकार फटकावले.
मुंबईच्या 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादने उत्तम सुरुवात केली आहे. सलामीवीर जेसन रॉय तुफान फलंदाजी करत असून 5 षटकानंतर एकही विकेट न गमावता हैद्राबादचा स्कोर 60 धावा आहे.
सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईने 9 वी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने सूर्यकुमारला 82 धावांवर असताना मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं.
मुंबईने सातवी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने नॅथन कुल्टर नाईलला 3 धावांवर असताना मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं. (मुंबई 206/7)
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत डॅनियल ख्रिस्टीयनच्या चेंडूवर 10 धावा करुन बाद झाला आहे.
अभिषेक शर्माने जिमी निशम शून्यावर बाद केलं. मोहम्मद नबीने सुरेख झेल घेत त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (मुंबई 151/5)
अभिषेक शर्माने कायरन पोलार्डला (13) जेसन रॉयकरवी झेलबाद केलं. (मुंबई 151/4)
मुंबईने मोठी विकेट गमावली आहे. उम्रान मलिकने आक्रमक इशान किशनला 84 धावांवर यष्टीरक्षक रिद्धीमान साहाकरवी झेलबाद केलं. (मुंबई 124/3)
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने हार्दिक पंड्याला 10 धावांवर असताना जेसन रॉयकरवी झेलबाद केलं. (मुंबई 113/2)
मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. फिरकीपटून राशिद खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं. (मुंबई 83/1)
अवघ्या 16 चेंडूत आणि सामन्यातील चौथ्याच षटकात इशान किशनने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं आहे. ( 4 षटकात मुंबई 67/0)
दुसऱ्या षटकात किशनने सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकर ठोकले
सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर इशान किशनने शानदार षटकार ठोकून चांगली सुरुवात केली आहे
सनरायर्स हैद्राबादचा कर्णधार केन विल्यमसनच्या हाताला दुखापत झाल्यामुळे आजच्या सामन्यात मनिष पांडे कर्णधार असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स निशाम, जसप्रीत बुमराह, नाथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.
जेसन रॉय , रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनिष पांडे (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रियम गार्ग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, सिद्धार्थ कौल.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.