मुंबई: फाफ डू प्लेसिसची (Faf du Plessis) कॅप्टन इनिंग्स त्याला रजत पाटीदारपासून दिनेश कार्तिकपर्यंत (Dinesh Karthik) सगळ्यांकडून मिळालेली सुयोग्य साथ या बळावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सनरायजर्स हैदराबादला (SRH) विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिलं आहे. फक्त सलामीला आलेल्या विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य चौघांनी आपली भूमिका चोख बजावली. RCB ने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 192 धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिसने 50 चेंडूत नाबाद 73 धावांची, रजत पाटीदारने 38 चेंडूत 48, ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 33 आणि शेवटी दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 30 धावा फटकावल्या. त्याच्या बळावर बँगलोरने सनरायजर्स हैदराबाद समोर विशाल लक्ष्य ठेवलं आहे. कार्तिकने 30 धावांच्या खेळीत 1 चौकार आणि 4 सिक्स मारले. शेवटच्या षटकात कार्तिकने SIX ची हॅट्ट्रिक केली.
इथे क्लिक करुन पहा DK चे दे दणादण SIX
आज सलामीवीर विराट कोहली डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीश सुचिताच्या बॉलिंगवर शुन्यावर आऊट झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. केन विलियमसनकडे सोपा झेल त्याने दिला. डू प्लेसिसने आज डावाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामुळेच RCB च्या अन्य फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली.
इथे क्लिक करुन पहा DK चे दे दणादण SIX
असा सहज रिव्हर्स स्वीप SIX मॅक्सवेलच मारतो, क्लिक करुन पहा
आज एसआरएचचा एकही गोलंदाज प्रभावी वाटला नाही. फझल फारुखीला संधी दिली. पण त्याने चार षटकात 47 धावा दिल्या एकही विकेट काढली नाही. वेगाचा बादशहा उमरान मलिकला आज फक्त दोन षक दिली. त्याने दोन ओव्हर्समध्येच 25 धावा दिल्या. फक्त तीन विकेट एसआरएचला मिळाल्या. त्यातल्या दोन विकेट जगदीश सुचिताने काढल्या.
प्लेऑफच्या दृष्टीने आजचा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाचा आहे. विजय दोघांना आवश्यक आहे. हैदराबादला तर जास्त आवश्यकता आहे. आयपीएलमध्ये लीग स्टेज आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अंतिम चार संघ प्लेऑफमध्ये दाखल होण्याची शर्यत आणखी तीव्र झाली आहे. हैदराबाद आणि बँगलोरची टीमही प्लेऑफच्या शर्यतीत आहे.
बँगलोरचा संघ 11 सामन्यात 12 पॉइंटस घेऊन गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादची टीम 10 सामन्यात 10 पॉइंटससह सहाव्या स्थानावर आहे. बँगलोरने विजय मिळवला, तर त्यांचे 14 पॉइंटस होतील. प्लेऑफच्या दिशेने त्यांचं आणखी एक पाऊल पडेल. हैदराबादने सामना जिंकला तर त्यांचे 12 पॉइंटस होतील. या सीजनमध्ये दोन्ही संघात पहिला सामना झाला आहे. जी मॅच हैदराबादने जिंकली होती.