SRH vs RCB IPL 2022: RCB ची टीम आज मैदानावर हिरव्या रंगाची जर्सी घालून का उतरलीय?

| Updated on: May 08, 2022 | 4:15 PM

वानखेडे स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (SRH vs RCB) सामना सुरु आहे. आयपीएलमधला हा 54 वा सामना सुरु आहे.

SRH vs RCB IPL 2022:  RCB ची टीम आज मैदानावर हिरव्या रंगाची जर्सी घालून का उतरलीय?
RCB
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (SRH vs RCB) सामना सुरु आहे. आयपीएलमधला हा 54 वा सामना सुरु आहे. आज सनरायजर्स हैदराबादचा संघ नेहमीच्या लाल ऐवजी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला आहे. बँगलोरची टीम 2011 पासून प्रत्येक सीजनमध्ये एक सामना हिरव्या रंगाची जर्सी (Green jersy) घालून खेळते. भावी पिढीमध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरणाबद्दल (greener planet) जागरुकता निर्माण करणं, हा हिरवी जर्सी परिधान करण्यामागे बँगलोरचा उद्देश आहे. आजच्या सामन्याआधीच RCB ने खेळाडूंचे हिरव्या रंगाची जर्सी परिधान केलेले फोटो पोस्ट केले होते. हिरवी जर्सी परिधान करण्यामागचा उद्देशही विराट कोहलीने समजावून सांगितला. पृथ्वी रक्षणासाठी जागरुकता निर्माण करणं, हा त्यामागचा उद्देश असल्याचं विराटने सांगितलं. 2011 पासून आरसीबीच्या संस्कृतीचा हा भाग असल्याचं विराट म्हणाला.

विराट लवकर बाद

आरसीबीचा कॅप्टन डू प्लेसिसने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण RCB ची खराब सुरुवात झाली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली शुन्यावर बाद झाला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीशा सुचिताच्या पहिल्याच चेंडूवर त्याने केन विलियमसनकडे सोपा झेल दिला. विराटच्या मागचं दुष्टचक्र अजूनही संपलेलं नाही. गुजरात विरुद्ध अर्धशतक त्यानंतर CSK विरुद्धची खेळी पाहून त्याला सूर गवसला आहे, असं वाटलं होतं. पण अजूनही विराटचा फॉर्मसाठी संघर्षच सुरुच आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा

आयपीएलमध्ये लीग स्टेज आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अंतिम चार संघ प्लेऑफमध्ये दाखल होण्याची शर्यत आणखी तीव्र झाली आहे. हैदराबाद आणि बँगलोरची टीमही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे.