SRH vs RR : खरच बोल्ट सारख्या बॉलरला असा SIX मारायला टॅलेंट हवं, राहुल त्रिपाठीची कमाल, VIDEO

| Updated on: May 25, 2024 | 8:04 AM

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Qualifier 2 : आयपीएल 2024 च्या दूसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत 37 धावा फटकावल्या. आपल्या बॅटिंग दरम्यान त्याने एक थक्क करणारा सिक्स मारला. हा सिक्स पाहून सगळेच हैराण झाले. पण नव्या ग्लोव्हजमुळे खेळ बिघडला.

SRH vs RR : खरच बोल्ट सारख्या बॉलरला असा SIX मारायला टॅलेंट हवं, राहुल त्रिपाठीची कमाल, VIDEO
rahul tripathi
Image Credit source: PTI
Follow us on

IPL 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये टक्कर झाली. या मॅचमध्ये राहुल त्रिपाठीने आपल्या बॅटिंगने सर्वांची मन जिंकली. राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत 37 धावा चोपल्या. त्याचा स्ट्राइक रेट 250 चा होता. राहुल त्रिपाठीने 5 सिक्स आणि 2 फोर मारले. त्रिपाठीचा एक सिक्स इतका लाजवाब होता की, प्रेक्षक थक्क झाले. त्याच्या तुफानी इनिंगचा शेवट नव्या ग्लोव्हजमुळे झाला.

राहुल त्रिपाठी आऊट झाला. पण त्याच्या या शॉटच इतक कौतुक का होतय ते समजून घेऊया. 5 व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने राहुल त्रिपाठीला शॉट ऑफ गुड लेंग्थचा चेंडू टाकला. शरीराच्या दिशेने हा चेंडू होता. त्रिपाठीने या चेंडूवर शरीराची जास्त हालचाल न करता जागेवरुनच स्कुपचा फटका खेळला. चेंडू थेट प्रेक्षक स्टँडमध्ये 6 धावा मिळाल्या. त्रिपाठीचा हा शॉट ज्याने पाहिला, ते थक्क झाले. स्वत: बोल्टला विश्वास बसला नाही.

हैदराबाद टीमसाठी तो झटका

राहुल त्रिपाठीने बोल्टला सिक्स मारल्यानंतर आपले ग्लोव्हज बदलले. तेच त्याच्या आऊट होण्याला कारण ठरलं. त्रिपाठीने पुढच्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर बोल्टच्या स्लोअर चेंडूवर फसला. त्रिपाठीने युजवेंद्र चहलला कॅच दिली. त्रिपाठीचा विकेट सनरायजर्स हैदराबाद टीमसाठी मोठा झटका होता. कारण विकेटवर तो सेट झालेला. उत्तम फलंदाजी करत होता.


टॉप फलंदाज फ्लॉप

क्वालिफायर 2 मध्ये हैदराबादचे टॉप फलंदाज फेल ठरले. अभिषेक शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये 12 रन्सवर आऊट झाला. एडेन मार्करमने फक्त 1 धाव केली. ट्रेविस हेडने 121 च्या स्ट्राइक रेटने 34 धावा केल्या.