मुंबई: गॉल मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत (AUS vs SL) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना झाला. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 3 दिवसात 10 विकेट राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा (Sri lanka) पहिला डाव 212 धावांवर संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 321 धावा करुन आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यानंतर यजमान संघाचा डाव 113 धावांवर संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघे 5 धावांचे लक्ष्य होते. पाहुण्यासंघाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्या पार केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला.
या सामन्यादरम्यान पॅट कमिन्सने एक असा षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 18 चेंडूत 26 धावा फटकावल्या. यात तीन षटकार आणि एक चौकार होता. कमिन्सने एक षटकार इतका जोरात मारला की, बॉल स्टेडियम पार रस्त्यावर जाऊन पडला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 69 व्या षटकात हा षटकार पहायला मिळाला.
Who’s going to find the ball Pat Cummins just hit out of Galle? ? #SLvAUS pic.twitter.com/BBSuoiJFm3
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) June 30, 2022
स्पिनर जेफ्री वेंडेसीच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर कमिन्सने गुडघ्यावर बसून लॉन्ग ऑनला हा षटकार खेचला. चेंडू थेट रस्त्यावर जाऊन पडला. चाहते कमिन्सच्या या फटक्याला मॉन्स्टर हिट बोलत आहेत. या सिक्सने कमिन्सच्या आयपीएलमधल्या फलंदाजीची आठवण झाल्याचं काही युजर्सनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याचदिवशी हा कसोटी सामना जिंकला. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेलाने पहिल्या डावात 58 धावा फटकावल्या. दुसऱ्याडावात श्रीलंकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला नाही. दुसऱ्याडावात कॅप्टन दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक 23 धावा केल्या. डिकवेला फक्त 3 धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने दोन्ही डावात मिळून एकूण 9 विकेट घेतल्या.