Test Cricket: दुसऱ्या कसोटीआधी संघाला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’, युवा खेळाडूला संधी

| Updated on: Sep 24, 2024 | 7:51 PM

Test Cricket: यजमान संघाने पहिल्या कसोटीत विजयाने सुरुवात करत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या काही तासांआधी स्टार खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.

Test Cricket: दुसऱ्या कसोटीआधी संघाला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आऊट, युवा खेळाडूला संधी
कसोटी क्रिकेट (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: bcci
Follow us on

टीम इंडिया मायदेशात बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. रोहितसेना या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शेजारी श्रीलंका घरात न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळत आहे. श्रीलंकाही न्यूझीलंड विरूद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे. श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि अंतिम सामना हा 26 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र त्याआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे. श्रीलंकेचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. विश्वा फर्नांडोच्या जागी अनकॅप्ड खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. विश्वाच्या जागी ऑफ स्पिनर निशान पीरिस याला संधी दिली गेली आहे.

विश्वा फर्नांडो याला सरावादरम्यान हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास होत असल्याचं जाणवलं. त्यामुळे फर्नांडोवर आवश्यक उपचार करण्यात आले. फर्नांडोला दुखापतीतून पू्र्णपणे फिट होण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. फर्नांडोच्या जागी 27 वर्षीय ऑफ स्पिनर निशान पीरिसला संधी दिली आहे, असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.

फर्नांडोने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत 86 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसाठी हा मोठा झटका आहे. आता फर्नांडोच्या जागी संधी मिळालेल्या निशानला पदार्पणाची संधी मिळणार का? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. निशानने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 41 सामन्यांमध्ये 24.37 च्या सरासरीने 172 विकेट्स घेतल्या आहेत.

विश्वा फर्नांडोला दुखापत भोवली

दुसऱ्या कसोटीसाटी श्रीलंकेचा सुधारित संघ : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, मिलन प्रियंका, निशारा, निशारा, मिलन, निशारा, निशारा, रमेश मेंडिस. जेफ्री वँडरसे आणि ओशादा फर्नांडो.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टीम साऊथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरोर्क, विल यंग, ​​मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री आणि बेन सीयर्स.