टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना हा बरोबरीत सुटला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 230 वर ऑलआऊट झाली. त्यामुळे पहिली वनडे मॅच ही टाय झाली. आयसीसीच्या नियमांनुसार एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेतील सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर होत नाही. त्यामुळे पहिला सामना निकाली निघू शकला नाही. त्यानंतर आता दोन्ही संघांना दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दोन्ही संघांचा दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.
हा सामना कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.
चरिथ असालंका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा आहे. दोन्ही कर्णधारांचा आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नांमध्ये कोणला यश येतं हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना रविवारी 4 ऑगस्टला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना हा आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही (फ्री डीश) सामना पाहायला मिळेल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.