सिडनी: श्रीलंकन क्रिकेटर दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियन कोर्टाने झटका दिला आहे. दानुष्का गुणथिलकालामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंकन टीमच नाव खराब झालय. दानुष्का गुणथिलका या श्रीलंकन क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालीय. सिडनीमध्ये काल ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दानुष्का गुणथिलकाला अटक केली. त्याच्या अटकेमुळे गुणथिलकाच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या
दानुष्का गुणथिलकाला सिडनी कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं. यावेळी त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या. गुणथिलकाला ऑस्ट्रेलियान कोर्टाने जामीन नाकारलाय. त्यामुळे त्याला तुरुंगातच रहाव लागणारय.
ऑस्ट्रेलियात काय शिक्षा होते?
दानुष्का गुणथिलका आता जामिनासाठी न्यू साऊथ वेल्स सुप्रीम कोर्टात अर्ज करणार आहे. गुणथिलकाला जामीन मिळाला नाही, तर त्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. ऑस्ट्रेलियात बलात्कार प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होते.
कधी भेट घेतली होती?
दानुष्का गुणथिलकाला रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास हॉटेलमधून अटक करण्यात आली. श्रीलंकन क्रिकेट टीम या हॉटेलमध्ये उतरली होती. श्रीलंकन टीम त्यावेळी मायदेशी रवाना होण्याची तयारी करत होती. गुणथिलकावर 2 नोव्हेंबरला एका ऑस्ट्रेलियन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या महिलेला तो 29 ऑक्टोबरला भेटला होता.
दानुष्का गुणथिलका श्रीलंकन टीममधून सस्पेंड
दानुष्का गुणथिलकाला आधी सुद्धा वादात सापडला आहे. 2018 साली दानुष्का गुणथिलकाला 6 मॅचेससाठी सस्पेंड करण्यात आले होते. आता ताज्या घटनेनंतर दानुष्का गुणथिलकाला श्रीलंकन टीमने निलंबित केलं आहे.
श्रीलंकेकडून कुठल्या मॅचमध्ये खेळला?
श्रीलंकन टीमच वर्ल्ड कपमधील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. शनिवारी श्रीलंकेचा इंग्लंडने पराभव केला. दानुष्का गुणथिलकाला पहिल्या राऊंडमध्ये नामीबिया विरुद्ध खेळला. त्यावेळी तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. श्रीलंकन टीमचा नामीबियाकडून पराभव होऊनही ते सुपर 12 साठी पात्र ठरले होते.