सिडनी: श्रीलंकन क्रिकेटर दानुष्का गुणातिलकाला अखेर बलात्कार प्रकरणात जामीन मिळाला आहे. सिडनीच्या हॉटेलमध्ये श्रीलंकन टीम उतरली होती. त्यावेळी दानुष्का गुणातिलकाला अटक करण्यात आली. तेव्हापासूनच तो तुरुंगात बंद होता. श्रीलंकन क्रिकेट असोशिएशनच्या मदतीने त्याला जामीन मंजूर झाला. दानुष्का गुणातिलकाला जामिनासाठी 1 कोटी रुपये भरावे लागले.
6 नोव्हेंबरच्या मध्यरात्री श्रीलंकन टीम मायदेशी परतण्याची तयारी करत असताना दानुष्का गुणातिलकाला अटक झाली होती.
डेटिंग APP च्या माध्यमातून ओळख झालेली
टी 20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकन टीम इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा सामना खेळली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुणातिलका या मॅचआधीच दुखापतीमुळे टीमच्या बाहेर गेला होता. त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश झाला होता. टीम मॅनेजमेंटच्या सल्ल्याने तो श्रीलंकेतच थांबला होता. ऑस्ट्रेलियात एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. डेटिंग APP च्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती.
तेव्हा कोर्टाने नाकारलेला जामिन
महिलेने आरोप केल्यानंतर दानुष्काला सिडनीच्या ससेक्स स्ट्रीट हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्याला सिडनीच्या कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याला कोर्टाकडून जामीन नाकारण्यात आला होता.
11 दिवसानंतर जामीन
तुरुंगात 11 दिवस काढल्यानंतर आता दानुष्का गुणातिलकाला जामीन मिळाला आहे. सिडनीच्या स्थानिक कोर्टाने त्याला जामीन मंजूर केलाय. त्याच्या कुटुंबाला दिलासा मिळालाय.
वादांशी जुन नातं
दानुष्का गुणातिलका याआधी सुद्धा वादात सापडलाय. बॅड बॉयची त्याची इमेज आहे. 2018 मध्येही दानुष्का 6 मॅचसाठी निलंबित झाला होता. दानुष्का गुणातिलकाचा मित्र, तेव्हा नॉर्वेच्या एका महिलेवर बलात्काराच्या आरोपात फसला होता.