प्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य

| Updated on: Jul 13, 2021 | 11:20 AM

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या त्याच्या खेळासह खाजगी जीवनातील वादांमुळेही बराच चर्चेत राहिला आहे.

प्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य
sanath jaysurya
Follow us on

कोलंबो : सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) हे श्रीलंकेच्या क्रिकेटसह जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव. जयसूर्याने श्रीलंका संघाकडून अनेक वर्षे स्फोटक फलंदाजी केली. गोलंदाजीतही त्याने चांगली चमक दाखवत श्रीलंकेला अनेक सामने जिंकवून दिले. 90 च्या दशकातील सर्वात वेगवान शतक आणि अर्धशतक जयसूर्याच्याच नावावर होते. 1996 ला विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकन संघातही जयसूर्या होता. त्याने एकूण 586 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात110 कसोटी, 445 एकदिवसीय आणि 31 टी-20 सामन्यांचा समावेश होतो. ज्यात एकूण 440 विकेट्सह 20 हजार 859 रन्स कुटले. (Sri Lankan Cricketer Sanath Jayasuriya Accused of Leaking his Sex Tape With his Girlfriend)

क्रिकेटच्या मैदानावर इतकी धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या जयसूर्याच्या नावावर खाजगी जीवनात मात्र काही गंभीर आरोप करण्यात आले. ज्यात कधी भ्रष्टाचार तर कधी चूकीची कृत्य असे विविध आरोप होते. यातीलच एक आरोप म्हणजे त्याच्या एकेकाळी प्रेयसी असणाऱ्य़ा मलिका सीरिसेनाने (Maleeka Sirisena) त्याच्यावर त्यांची सेक्स टेप लिक केल्याचा आरोप केला होता. तिच्यासोबत जयसूर्या विवाहबाह्य संबधात असल्याचही समोर आलं होतं.

विवाहीत असताना साखरपुडा केल्याचाही आरोप

हा सर्व प्रकार 2017 मधील असून त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमांनी प्रेयसीसोबत बदला घेण्यासाठी स्वत:च व्हिडीओ लिक केल्याचा दावा केला होता. कोलंबो टेलीग्राफमध्ये छापलेल्या एका आर्टीकलनुसार, मलिकाने आपल्या काही जवळच्या व्यक्तींना सर्व प्रकार सविस्तर सांगितला. एका छोट्याशा मंदिरात जयसूर्या माझ्याशी साखरपुडा करत होता. त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसतानाही तो असं करत होता हे गंभीर होतं. तेव्हा तो केवळ एक क्रिकेटर नसून महिंदा राजपक्षाच्या सरकारमध्ये मंत्री देखील होता. मात्र हे सर्व प्रकरण दाबण्यात आल्याचही मलिकाने सांगितले.

भारताविरुद्ध जयसूर्या आक्रमक

सनथ जयसूर्या याचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने भारताविरुद्ध 10 कसोटी सामन्यांत 67 च्या सरासरीने 938 धावा केल्या आहेत. तर 89 एकदिवसीय सामन्यांत 2 हजार 899 धावा कुटल्या आहेत. 1997 च्या पेप्सी कपमध्ये त्याने भारताच्या 225 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकहातीच 151 धावा लगावल्या होत्या.

हे ही वाचा –

IPL मधून कोट्यावधी कमावून भारतीयांचीच थट्टा, इंग्लंडच्या बटलर-मॉर्गनने रंग दाखवला

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात मोठा इतिहास न्यूझीलंडच्या नावावर, वन डे मध्ये 491 धावा, 347 धावांचा ‘भयंकर’ विजय

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

(Sri Lankan Cricketer Sanath Jayasuriya Accused of Leaking his Sex Tape With his Girlfriend)