सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ ने दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. सीरीजच्या मध्यावरच दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलडं दौऱ्यासाठी टीमची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी नवखा संघ निवडला आहे. 14 पैकी 7 असे प्लेयर आहेत, ज्यांनी कधी कुठली टेस्ट मॅच खेळलेली नाही. त्याचवेळी कॅप्टनही अशा प्लेयरला बनवलय, जो त्या सीरीजमध्ये डेब्यु करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या कृतीवर अनेक माजी क्रिकेटपटू भडकले आहेत. स्टीव वॉ त्यापैकीच एक आहे. “दक्षिण आफ्रिकेला कुठलीही फिकिर नाही असं मला वाटतय. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड आपल भविष्य दाखवतय. ते आपल्या अव्वल खेळाडूंना घरी ठेवून नव्या मुलांना पाठवत आहेत. जर मी न्यूझीलंडच्या टीममध्ये असतो, तर यांच्यासोबत क्रिकेटच खेळलो नसतो”
न्यूझीलंड क्रिकेटबद्दल तुम्हाला आदर नाही का?
“दक्षिण आफ्रिका का खेळतेय ते समजत नाहीय. न्यूझीलंड क्रिकेटबद्दल तुम्हाला आदर नाही हे दाखवताय का?. फक्त T20 लीगसाठी टीम स्वत:ला कशाप्रकारे बदलतायत ते यातून दिसून येतं. वेस्ट इंडिजने मागच्या दोन वर्षांपासून आपली बेस्ट टीम निवडलेली नाही. निकोलस पूरन टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करु शकतो, पण तो खेळतच नाही” असं स्टीव वॉ म्हणाले.
आयसीसीने वेळीच लक्ष देणं गरजेच
स्टीव वॉ एवढ्यावरच थांबला नाही. पाकिस्तान आपली बेस्ट टेस्ट टीम घेऊन ऑस्ट्रेलियात आलेले नाहीत असंही म्हटलं. यातून हे दिसून येतय की, टीम्स टेस्ट क्रिकेटला प्राधान्य देत नाहीयत. आयसीसीने याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण मोठ्या टीम्सप्रमाणे अन्य टीम्सनाही टेस्ट क्रिकेटला गांभीर्याने घेतलं पाहिजे.
दक्षिण आफ्रिकेने असं का केलं?
भारतातील आयपीएलप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतही देशांतर्गत T20 लीग होणार आहे. म्हणून दक्षिण आफ्रिकेने आपल्या सीनियर आणि फेमस खेळाडूंची न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी निवड केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेची इच्छा आहे की, त्यांच्या मोठ्या खेळाडूंनी लीगमध्ये खेळावं. अन्य देशाचे स्टार क्रिकेटपटू सुद्धा येणार आहेत. म्हणूनच दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डावर टीका सुरु आहे.