मुंबई: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या (ENG vs SA) संघात ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडवर दबाव बनवून ठेवला आहे. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव स्वस्तात आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 161 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्यादिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव 326 धावांवर आटोपला. या दरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडही (Stuart broad) चर्चेत होता. हा वेगवान गोलंदाज बॉलिंग नाही, तर आपल्या फिल्डिंगमुळे चर्चेत आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावा दरम्यान एक जबरदस्त कॅच घेऊन सगळ्यांच मन जिंकलं. 78 व्या षटकात ब्रॉडने रबाडाची सुंदर कॅच घेतली. मॅथ्यू पॉट्सच्या शॉर्ट बॉलवर रबाडाने पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू तो व्यवस्थित टाइम करु शकला नाही. चेंडू हवेत उडाला. त्यावेळी वाइड लॉन्ग ऑनवर उभ्या असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने हवे मध्ये उंच झेप घेत, एकाहाताने जबरदस्त कॅच घेतली. स्टेडियम मध्ये उपस्थित असलेले हा झेल पाहून थक्क झाले. कॅच घेतल्यानंतर ब्रॉड खाली पडला. पण त्याने चेंडू सोडला नाही. कॅप्टन बेन स्टोक्सला इतका आनंद झाला की, त्याने ब्रॉडला थेट मिठी मारली.
Oh Broady! ?
Live clips: https://t.co/2nFwGblL1E
??????? #ENGvSA ?? | @StuartBroad8 pic.twitter.com/SCkwjfD7g5
— England Cricket (@englandcricket) August 19, 2022
स्टुअर्ट ब्रॉडने चेंडूने सुद्धा लॉर्ड्सच्या मैदानात कमाल दाखवली. ब्रॉडने लॉर्ड्सच्या मैदानात 100 कसोटी विकेट घेण्याचा कारनामा करुन दाखवला. एकाच मैदानात 100 विकेट घेणारा तो चौथा गोलंदाज आहे. त्याच्यााधी जेम्स अँडरसननेही लॉर्ड्स वर विकेट्सच शतक पूर्ण केलय. मुरलीधरनने गॉल आणि कँडी मध्ये 100-100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. एसएससी मध्ये मुरलीधरनने 166 विकेट घेतल्या आहेत. रंगना हेराथनेही गॉल मध्ये 102 विकेट घेतल्या आहेत.
गोलंदाजांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी इंग्लंडची हालत खराब केली. केशव महाराजने 8 व्या नंबरवर फलंदाजी करताना 49 चेंडूत 41 धावा केल्या. एनरिक नॉर्खियाने 10 व्या क्रमांकावर येऊन नाबाद 28 धावा फटकावल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 326 धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.