Sunil Gavaskar On Ishan Kishan: टीम इंडियाने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 12 धावांनी पराभूत केलं. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार खेळ दाखवला. शुभमन गिलने 208 धावा फटकावल्या. त्याचवेळी मोहम्मद सिराजने 4 विकेट काढल्या. या मॅचमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर इशान किशनने एक कृती केली. ही कृती महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी अजिबात आवडली नाही. सुनील गावस्कर हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सुनील गावस्कर इशानच्या त्या कृतीवर नाराज झाले. त्यांनी मनातील नाराजी बोलून दाखवली.
कितव्या ओव्हरमध्ये हे घडलं?
न्यूझीलंडची बॅटिंग सुरु होती. कुलदीप यादव 16 वी ओव्हर टाकत होता. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम क्रीजवर होता. बॅटिंग सुरु होती. इशान किशन स्टम्पजवळ उभा राहून किपिंग करत होता. कुलदीप यादवचा चेंडू टॉम लॅथम बॅकफूटवर जाऊन खेळला. त्यावेळी बेल्स पडल्या. टीम इंडियाने अंपायरकडे अपील केलं. अंपायरने थर्ड अंपायरकडे पाठवलं. रिप्लेमध्ये लॅथम हिट विकेट नसल्याच दिसलं. इशानने बेल्स उडवले होते. रिप्लेमध्ये स्पष्ट झाल्यानंतर लॅथम नाराज झाला. त्याने मान हलवून नाराजीचे संकेत दिले. पण इशानला काही फरक पडला नाही. तो लॅथमकडे बघून हसत होता. सहाजिकच लॅथमला धडा शिकवण्यासाठी इशानने हे सर्व केलं.
त्यावेळी गावस्कार कॉमेंट्री बॉक्समध्ये होते
हा प्रकार घडला, त्यावेळी सुनील गावस्कार कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. त्यांना ही गोष्ट पटली नाही. गावस्कर म्हणाले, “बेल्स उडवण ठीक होतं. पण त्यासाठी अपील करायची गरज नव्हती. इशानने जे केलं, ते क्रिकेट नाहीय”
इशानने हे सर्व का केलं?
या मॅचमध्ये हार्दिक पंड्याच्या बाबतीत थर्ड अंपायरने दिलेल्या एका निर्णयाने सर्वांनाच हैराण करुन सोडलं. न्यूझीलंडच्या बॉलरने टाकलेल्या चेंडूवर कट मारण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला. स्टम्पच्या वर असलेल्या बेल्स हलल्या. काही स्पष्ट दिसलं नाही. त्यामुळे थर्ड अंपायरची मदत घेतली.
लॅथमची चूक हार्दिकच नुकसान
थर्ड अंपायरने वेगवेगळ्या अँगलने रिप्ले पाहिला. त्यावेळी चेंडू बेल्स लागल्याच कुठेही स्पष्ट दिसलं नाही. काही अँगल्समध्ये चेंडू विकेटकीपर टॉम लॅथमच्या ग्लोव्हजमध्ये गेला, त्यानंतर त्याच्या ग्लोव्हजमुळे बेल्स हलल्याच दिसत होता. हार्दिक क्रीजच्या बाहेर नव्हता किंवा चेंडू बेल्सला लागला नव्हता. म्हणजे हार्दिक स्टम्पिंग आणि कॅच आऊट झाला नव्हता.
How is this even OUT!! @ICC #INDvsNZ #HardikPandya pic.twitter.com/uT21O8Xxx5
— cric guru (@bccicc) January 18, 2023
सर्वचजण चकीत झाले
मात्र तरीही थर्ड अंपायरने हार्दिकला बोल्ड दिलं. अंपायरच्या या निर्णयाने सर्वचजण चकीत झाले. खरंतर संशयाचा फायदा बॅट्समनला मिळतो. हार्दिक पंड्या पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर काही वेळाने लॅथमने पुन्हा एकदा आपल्या ग्लोव्हजने बेल्स उडवले.
इशानने शिकवला धडा
लॅथमने दुसऱ्यांदा हीच गोष्ट जाणूनबुजून केली होती. दोनवेळा त्याने ही चूक केली. भारतीय क्रिकेट चाहते आणि टीम इंडियातील खेळाडून ही कृती पटली नव्हती. इशान किशनला हे आवडल नाही. त्याने धडा शिकवण्याचा चंग बांधला. न्यूझीलंडची फलंदाजी सुरु झाली. टॉम लॅथम क्रीजवर आला, त्यावेळी इशान किशनने हीच पद्धत अवलंबली.