Sunil Gavaskar On IND vs SL 2ND T20: पुण्यात काल भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा टी 20 सामना झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हा सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाचे दोन प्लेयर्स वगळता सर्व फ्लॉप ठरले. टीम इंडियाला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या पराभवामुळे निराश झाले. त्यांनी खराब खेळणाऱ्या प्लेयर्सचा क्लास घेतला. सुनील गावस्करांनी पराभवाच कारण सांगितलं.
सुनील गावस्करांची सडकून टीका
श्रीलंकेने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाचे गोलंदाज फ्लॉप ठरले. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 206 धावा दिल्या. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात एकूण 7 नो बॉल टाकले. यात अर्शदीपने एकट्याने 5 नो बॉल टाकले. सुनील गावस्करांनी या खराब गोलंदाजीवर सडकून टीका केली. त्यांनी खेळाडूंचा क्लास घेतला. “तुम्ही व्यावसायिक खेळाडू आहात, तुम्ही असं करु शकत नाही. आपण अनेकदा खेळाडूंना बोलताना ऐकतो की, आज गोष्टी आमच्या नियंत्रणात नव्हत्या. पण नो बॉल न टाकणं आपल्या हातात आहे. तुम्ही चेंडू टाकल्यानंतर काय होतं? फलंदाज काय करणार? ही दुसरी गोष्ट आहे. नो बॉल न टाकणं हे तुमच्या हातात आहे” असं गावस्कर म्हणाले.
अर्शदीप सिंहचा लज्जास्पद रेकॉर्ड
अर्शदीप सिंह सुद्धा पराभवाच एक प्रमुख कारण ठरला. त्याने 2 ओव्हर्समध्ये 5 नो बॉल टाकताना 37 धावा दिल्या. एकही विकेट त्याने घेतला नाही. अर्शदीप सिंह टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज बनला. अर्शदीप सिंह टी 20 क्रिकेटमध्ये सलग तीन नो बॉल टकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनलाय.
सीरीजमधला तिसरा सामना कधी?
टीम इंडियाने सीरीजची सुरुवात विजयाने केली. या मॅचमध्ये हार्दिक पंड्याने टॉस जिंकला. त्याने पहिली बॅटिंग करण्याऐवजी श्रीलंकेला संधी दिली. श्रीलंकेने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 206 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 207 धावांच टार्गेट होतं. टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करताना 8 विकेट गमावून 190 धावा केल्या. दोन्ही टीम्समध्ये टी 20 सीरीजचा शेवटचा सामना 7 जानेवारीला खेळला जाईल.