‘मग अझरुद्दीनने सत्य काय ते सांगावं’, सुनील गावस्करांचं रोहित-विराट वादावर भाष्य

| Updated on: Dec 15, 2021 | 1:13 PM

"या प्रकरणात लोकांनी लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. कोहली आणि रोहितचे संबंध कसे होते? या बद्दल अझरुद्दीनकडे काही आतली माहिती असेल, तर त्याने संपूर्ण सत्य काय आहे ते सर्वांना सांगावं" असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.

मग अझरुद्दीनने सत्य काय ते सांगावं, सुनील गावस्करांचं रोहित-विराट वादावर भाष्य
Sunil Gavaskar
Follow us on

मुंबई: रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) यांच्यामधील कथित वादावर भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी भाष्य केलं आहे. विराट आणि रोहितमध्ये सुरु असलेल्या कथित वादामध्ये तुम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका, असं सुनील गावस्कर यांनी क्रिकेट चाहते आणि पंडितांना आवाहन केलं आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून (South Africa oneday series) विराट कोहलीला ब्रेक हवा आहे. त्याने त्या बद्दल बीसीसीआयला कळवलं आहे. ही बातमी बाहेर आल्यापासूनच दोघांमधील वादांच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोहलीच्या ब्रेक मागण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे” असं मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटलं आहे. अझरने त्याच्या टि्वटमधून भारताच्या या दोन खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचे संकेत दिलेत. पण गावस्करांना हे मत पटलेलं नाही.

गावस्करांना नाही पटलं अझरुद्दीनचं मत

“या प्रकरणात लोकांनी लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. कोहली आणि रोहितचे संबंध कसे होते? या बद्दल अझरुद्दीनकडे काही आतली माहिती असेल, तर त्याने संपूर्ण सत्य काय आहे ते सर्वांना सांगावं” असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. “दोन्ही खेळाडू जो पर्यंत काही बोलत नाहीत, तो पर्यंत आपण निष्कर्षावर येऊ नये. अझरुद्दीन काही तरी बोलला आहे. त्याच्याकडे काय घडलं, त्याची माहिती असेल, तर त्याने समोर येऊन सांगावं” असं गावस्कर म्हणाले.

मागच्या आठवड्यात भारताच्या वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला. तेव्हापासून भारताच्या या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, रोहितची वनडे कर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे. असं काही नाहीय.

संबंधित बातम्या:
‘खेळापेक्षा कोणी मोठा नाही’, क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत
India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल?
विराट कोहली आज मौन सोडणार, वादग्रस्त प्रश्नांवर काय उत्तर देणार?