सुनील नरेन हा क्रिकेट विश्वात गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पण नरेन फलंदाज म्हणून देखील तितकाच धोकादायक आहे. सुनील नरेन जेव्हा बॅट घेऊन मैदानात उतरतो, तेव्हा प्रतिस्पर्धी टीमचा गोलंदाज सुद्धा टेन्शनमध्ये येतो. IPL 2024 च्या 16 व्या सामन्यात हेच दिसून आलं. लेफ्टी बॅटिंग करणाऱ्या सुनील नरेनने विशाखापट्टनममध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. सुनील नरेनने फक्त 21 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर अवघ्या 45 चेंडूत दिल्लीची धावसंख्या 100 पार पोहोचली. महत्त्वाच म्हणजे नरेनने पहिल्या पाच चेंडूत खातही उघडल नव्हतं. पण त्यानंतर 16 चेंडूत त्याने प्रतिस्पर्धी टीमची वाट लावून टाकली. याची सुरुवात सुनील नरेनने इशांत शर्माच्या ओव्हरपासून केली.
सुनील नरेनने चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या इशांत शर्माला बेकार धुतलं. या ओव्हरमध्ये नरेनने 3 सिक्स आणि 2 फोर मारुन 26 धावा वसूल केल्या. नरेनने इशांतच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन सिक्स लगावल्या. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर सिक्स आणि सहाव्या बॉलवर फोर. नरेनने पावरप्लेमध्येच अर्धशतक पूर्ण केलं.
सुनील नरेनमुळे केकेआरला हे शक्य झालं
कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 135 धावा ठोकल्या. नरेनच्या बळावर केकेआरची टीम 11 ओव्हरमध्येच 150 धावसंख्येपर्यंत पोहोचली. नरेनने या सोबतच T20 क्रिकेटमध्ये आपला सर्वाधिक व्यक्तीगत स्कोर केला. याआधी 75 ही त्याची बेस्ट धावसंख्या होती. सुनील नरेन शतक पूर्ण करु शकला नाही. 85 रन्सवर तो आऊट झाला. मिचेल मार्शने शॉर्ट बॉलवर त्याचा विकेट घेतला.
Sunil Narine at it again 🔥🔥@KKRiders are off to some start in Vizag!
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE#TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/UipTFUHznQ
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
ऋषभ पंतच्या चुकीची शिक्षा टीमला
दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनेच सुनील नरेनला एक जीवनदान दिलं. चौथ्या ओव्हरमध्ये इशांत शर्माच्या चेंडूवर नरेन बाद झाला. चेंडू बॅटच्या कडेला लागून ऋषभच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पण अंपायरने आऊट दिलं नाही. पंतने सुद्धा रिव्यू घेतला नाही. त्याची किंमत दिल्ली कॅपिटल्सला चुकवावी लागली.