हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबादच प्रदर्शन काही खास नाहीय. SRH ने 10 पैकी 6 सामने गमावलेत. पॉइंट्स टेबलमध्ये ते 9 व्या स्थानावर आहेत. SRH ला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व चारही सामने जिंकावे लागतील. त्याशिवाय दुसऱ्या टीम्सच्या निकालावर सुद्धा त्यांना अवलंबून रहाव लागेल.
SRH ची कामगिरी खराब होतेय, त्यात उमरान मलिकचा सुद्धा रोल आहे. उमरान मलिकने आय़पीएल 2023 मध्ये आतापर्यंत तसं काही खास प्रदर्शन केलेलं नाहीय. उमरान चालू सीजनमध्ये 7 मॅच खेळला असून त्याने 5 विकेट काढलेत. या दरम्यान त्याचा एव्हरेज 35.20 आणि इकॉनमी रेट 10.35 आहे. खराब कामगिरीमुळे त्याला काही सामन्यातून ड्रॉप सुद्धा करण्यात आलं.
चालू सीजनमध्ये उमरानचा इकॉनमी रेट काय?
महत्वाच म्हणजे या सीजनमध्ये उमरान मलिकच्या वेगाची सुद्धा चर्चा नाहीय. उमरान मलिकच्या चेंडूंमध्ये वेग आहे. पण स्विंग करण्याची क्षमता नाहीय. त्यामुळे त्याला पावरप्लेच्या नंतरच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजीची संधी मिळते. चालू सीजनमध्ये त्याला भरपूर मार पडलाय. उमरान मलिकचा दिशा आणि टप्पा सुद्धा योग्य राहिलेला नाहीय. त्याच्या गोलंदाजीवर बॅट्समन आरामात शॉट मारतायत. 10.35 त्याच्या बॉलिंगचा इकॉनमी रेट आहे.
मागच्या सीजनमध्ये किती विकेट काढले?
टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी सुद्धा उमरान मलिकच्या गोलंदाजीवर नाराजी व्यक्त केली. “फक्त वेगाने काम चालणार नाही. उमरानला कोणीतरी हे सांगितलं पाहिजे, 150 KMPH वेगात आलेला चेंडू बॅटला लागून 200 KMPH वेगाने जाऊ शकतो” असं शास्त्री म्हणाले. मागच्या सीजनमध्ये उमरान मलिकने 14 सामन्यात 22 विकेट काढले होते.
त्याला किती कोटींना रिटेन केलं?
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनआधी SRH ने 4 कोटी रुपयांमध्ये उमरान मलिकला रिटेन केलं होतं. आयपीएलमधील जोरदार प्रदर्शनामुळे त्याची टीम इंडियात एंट्री झाली. मागच्यावर्षी आय़र्लंड विरुद्ध टी 20 सामन्याद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु केला.
उमरानने आतापर्यंत किती विकेट काढलेत?
उमरान मलिक टीम इंडियाकडून 8 वनडे आणि 8 टी 20 सामने खेळलाय. वनडेमध्ये 13 आणि टी 20 मध्ये त्याने 11 विकेट काढलेत. आयपीएल करियमध्ये त्याने 24 सामन्यात 29 विकेट घेतलेत.