मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे तीन सामने होताच एक मोठं संकट पुन्हा आय़पीएलसमोर उभ येऊन ठाकलं आहे. कोरोना महामारीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाली आहे (T Natrajan Corona Positive). महत्त्वाचं म्हणजे आजच हैद्राबाद संघाचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना (SRH vs DC) होणार आहे. पण त्यापूर्वीच ही बातमी समोर आली आहे.
टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं असून आज होणाऱ्या SRH vs DC सामन्यावर मात्र कोणतं संकट नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.
NEWS – Sunrisers Hyderabad player tests positive; six close contacts isolated.
More details here – https://t.co/sZnEBj13Vn #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2021
कोरोनाबाधित आढळलेल्या टी. नटराजनची सर्वात आधी RT-PCR टेस्ट करण्यात आली होती. सामन्याआधी सर्वच खेळाडूंची ही चाचणी होतेय त्यात तो कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर त्याच्या निकट संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये विजय शंकर (खेळाडू), विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर (फीजिओ), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), पीए. गणेशन (नेट बोलर) यांचा समावेश आहे. दरम्यान संघाच्या इतर सदस्यांची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
हे ही वाचा
इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी
IPL 2021: कार्तिक त्यागीने पंजाबच्या तोंडचा घास हिरावला, अखेरच्या षटकात राजस्थानचा रोमहर्षक विजय
IPL 2021: राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला 12 लाखांचा दंड, नेमकं कारणं काय?
(Sunrisers hyderabad Player T natrajan being corona positive Before DC vs SRH match IPL 2021 in danger)