SRH vs GT Live Score, IPL 2022: अखेर SRH ने गुजरातचं विजय अभियान रोखलं, आठ विकेट राखून विजय

| Updated on: Apr 12, 2022 | 12:01 AM

sunrisers hyderabad vs gujarat titans Live in Marathi: गुजरातचा संघ आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यांनी तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. हैदराबादचा संघ तीन पैकी फक्त एका सामन्यात विजयी ठरला आहे.

SRH vs GT Live Score, IPL 2022: अखेर SRH ने गुजरातचं विजय अभियान रोखलं, आठ विकेट राखून विजय
सनरायजर्स हैदराबाद वि गुजरात टायटन्स
Follow us on

SRH vs GT, IPL 2022:  इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयी अभियानाला अखेर आज ब्रेक लागला. डी.वाय.पाटील स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabadगुजरात टायटन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. गुजरातने याआधी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी सर्वप्रथम लखनौ सुपर जायंट्स त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या संघांवर विजय मिळवले होते. आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सनरायजर्स हैदराबादचा संघ यंदाच्या सीजनमध्ये विशेष फॉर्ममध्ये नाहीय. पहिले दोन सामने त्यांनी गमावले होते. शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि आज गुजरात टायटन्सवर त्यांनी विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे.

Key Events

गुजरात विजयी चौकार मारणार?

आपला पहिलाच आयपीएल सीजन खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने विजयी हॅट्ट्रिक केली आहे. सध्याचा त्यांचा फॉर्म बघता, ते विजयी चौकार मारु शकतात.

सनरायजर्स हैदराबादला आव्हान

सनरायजर्स हैदराबादच्या संघाने आतापर्यंत विशेष कामगिरी केलेली नाही. मागच्या सामन्यात त्यांनी CSK ला हरवून विजयाचं खात उघडलं होतं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 11 Apr 2022 11:19 PM (IST)

    अखेर SRH ने गुजरातचं विजय अभियान रोखलं

    अखेर डी.वाय.पाटील स्टेडियमवर SRH ने गुजरातचं विजय अभियान रोखलं. सनरायजर्स हैदराबादने गुजरात टायटन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. निकोलस पूरनने दर्शन नलकांडेच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गुजरात टायटन्सचा हा पहिला पराभव तर SRH चा सलग दुसरा विजय आहे.

  • 11 Apr 2022 11:11 PM (IST)

    12 चेंडूत विजयासाठी 13 धावांची गरज

    SRH च्या 18 ओव्हरमध्ये दोन बाद 150 धावा झाल्या आहेत. आता 12 चेंडूत विजयासाठी 13 धावांची गरज आहे.


  • 11 Apr 2022 11:06 PM (IST)

    कॅप्टन केन विलियमसन OUT

    हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर SRH चा कॅप्टन केन विलियमसन 57 धावांवर आऊट झाला. हार्दिक पंडयाने तेवतियाकरवी झेलबाद केलं. 17 षटकात हैदराबादच्या दोन बाद 135 धावा झाल्या आहेत. SRH ला विजयासाठी 18 चेंडूत विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे.

  • 11 Apr 2022 10:53 PM (IST)

    SRH च्या एक बाद 116 धावा

    15 षटकात SRH च्या एक बाद 116 धावा झाल्या आहेत. केन विलियमसन 46 आणि निकोलस पूरन 7 धावांवर खेळतोय.

  • 11 Apr 2022 10:46 PM (IST)

    दुखापतीमुळे राहुल त्रिपाठी रिटायर्ड हर्ट

    राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळल्यानंतर राहुल त्रिपाठी रिटायर्ड हर्ट झाला आहे. 17 धावांवर असताना दुखापतीमुळे त्याने मैदान सोडलं आहे.

  • 11 Apr 2022 10:42 PM (IST)

    विलियमसन-त्रिपाठीची जोडी जमली

    SRH ची दमदार फलंदाजी सुरु आहे. तेरा षटकात त्यांच्या एक बाद 104 धावा झाल्या आहेत. केन विलियमसन 42 आणि राहुल त्रिपाठी 17 धावांवर खेळतोय.

  • 11 Apr 2022 10:15 PM (IST)

    राशिद खानने SRH दिला पहिला झटका

    राशिद खानने SRH पहिला झटका दिला आहे. दमदार फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माला राशिदने साई सुदर्शनकरवी 42 धावांवर झेलबाद केलं. त्याने 6 चौकार लगावले. नऊ षटकात SRH च्या एक बाद 66 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2022 10:00 PM (IST)

    विलियमसन-शर्माची जमली जोडी

    केन विलियमसन, अभिषेक शर्माची जोडी जमली आहे. पावरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. सहा षटकात बिनबाद 42 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्मा 24 आणि विलियमसन 18 धावांवर खेळतोय.

  • 11 Apr 2022 09:55 PM (IST)

    हैदराबादच्या बिनबाद 25 धावा

    पाच षटकात हैदराबादच्या बिनबाद 25 धावा झाल्या आहेत. कॅप्टन विलियमसन 18 आणि अभिषेक शर्मा सात धावांवर खेळतोय.

  • 11 Apr 2022 09:41 PM (IST)

    विलियमसन-अभिषेक शर्माची जोडी मैदानात

    दोन षटकात SRH च्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत. केन विलियमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानात आहे.

  • 11 Apr 2022 09:17 PM (IST)

    हार्दिक पंड्याची हाफ सेंच्युरी

    गुजरात टायटन्सने निर्धारीत 20 षटकात सात बाद 162 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याने 42 चेंडूत नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. यात चार चौकार आणि एक षटकार आहे. त्या व्यतिरिक्त अभिनव मनोहरने सर्वाधिक 35 धावा केल्या.

  • 11 Apr 2022 09:10 PM (IST)

    अखेर अभिनव मनोहरचा झेल पकडला

    सलग तीन कॅच ड्रॉप केल्यानंतर अखेर अभिनव मनोहरचा राहुल त्रिपाठीने झेल घेतला. भुवनेश्वर कुमारला हा विकेट मिळाला. 19 षटकात गुजरात टायटन्सच्या पाच बाद 155 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2022 09:04 PM (IST)

    अभिनव मनोहरची जबरदस्त फलंदाजी

    अभिनव मनोहर जबरदस्त फलंदाजी करतोय. नटराजनच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. 18 षटकात गुजरात टायटन्सच्या चार बाद 148 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत 32 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2022 08:58 PM (IST)

    हार्दिक-अभिनव मनोहरची जोडी जमली

    17 षटकात गुजरात टायटन्सच्या चार बाद 135 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 45 आणि अभिनव मनोहरची 21 जोडी मैदानात आहे.

  • 11 Apr 2022 08:25 PM (IST)

    हार्दिक पंड्या-डेविड मिलरची जोडी मैदानात

    11 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या तीन बाद 84 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 27 आणि डेविड मिलर आठ धावांवर खेळतोय.

  • 11 Apr 2022 08:10 PM (IST)

    मॅथ्यू वेड बाद

    आठ षटकात गुजरात टायटन्सच्या तीन बाद 64 धावा झाल्या आहेत. उमरान मलिकने शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू वेडला पायचीत पकडलं. षटकातील पहिला चेंडू हार्दिकच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर हार्दिकने दोन चेंडूंवर सलग दोन चौकार लगावले.

  • 11 Apr 2022 08:00 PM (IST)

    गुजरात टायटन्सची दुसरी विकेट, साई सुदर्शन OUT

    गुजरात टायटन्सची दुसरी विकेट गेली आहे. साई सुदर्शन OUT झाला. नटराजनच्या गोलंदाजीवर त्याने विलियमसनकडे सोपा झेल दिला. साई सुदर्शनने 11 धावा केल्या. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात गुजरातच्या दोन बाद 51 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2022 07:51 PM (IST)

    मॅथ्यू वेड-साई सुदर्शनची जोडी मैदानात

    चार षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 36 धावा झाल्या आहेत. मॅथ्यू वेड 15 आणि साई सुदर्शन 2 धावांवर खेळतोय.

  • 11 Apr 2022 07:45 PM (IST)

    गुजरात टायटन्सला पहिला झटका

    गुजरात टायटन्सला पहिला झटका बसला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सलामीवर शुभमन गिल OUT झाला आहे. भुवनेश्वर कुमारचा चेंडू कव्हर्समध्ये फटकावताना राहुल त्रिपाठीने जबरदस्त झेल घेतला. शुभमन गिल 7 धावांवर आऊट झाला. तीन षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 30 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2022 07:41 PM (IST)

    दोन ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    दोन ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या बिनाबाद 24 धावा. मार्को जॅनसेनने टाकलं दुसरं षटक

  • 11 Apr 2022 07:38 PM (IST)

    GT ची पहिल्या ओव्हरपासून चांगली सुरुवात

    भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सच्या बिनबाद 17 धावा. शुभमन गिल आणि मॅथ्यू वेडची सलामीची जोडी मैदानात

  • 11 Apr 2022 07:15 PM (IST)

    अशी आहे SRH ची Playing – 11

    केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन

  • 11 Apr 2022 07:13 PM (IST)

    अशी आहे गुजरात टायटन्सची Playing – 11